“ज्याप्रमाणे एकट्या तथागत भगवान बुद्धानी धम्मक्रांतीच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रतीक्रांतीला शह देऊन पराभूत केले. आणि हा पराभव जसा आर्याच्या जिव्हारी लागला. अगदी तेवढ्याच ताकदीने ग्रीकमध्ये सुद्धा एकट्या ‘सॉक्रेटिसने ‘ तेथील आर्याना अर्थात सोफेस्टीकेटेड कुसंस्कृतीला जगाच्या पराभूत केले.
” सॉक्रेटीस हे संत गाडगेबाबाप्रमाणेच, अण्णाभाऊ साठेप्रमाणे, वामनदादाप्रमाणे विनाभिंतीच्या विद्यापीठातून डॉक्टरांचे डॉक्टर पदवी घेऊन आलेले. घरात अठरा विश्व् दारिद्र्य, उपजीविकेच्या साधनाच्या मागे न लागता लेकराबाळांची जबाबदारी पूर्ण आपल्या अर्धांगिनीवर सोडली. सॉक्रेटीस यांना त्यांच्या दोन पत्नीपासून तीन मुले होती.
पहिली पत्नी झान्थीप्पीपासून एक मुलगा लॅम्प्रोक्लेस आणि दुसरी पत्नी मायट्रोपासून सोफ्रोनिक्स आणि मेनेक्सेनस अशी एकूण तीन मुले झाली. परंतु ,दुसरी पत्नी लवकरच मरण पावली.त्यामुळे तिन्ही मुलांचे संगोपन शेवटपर्यंत म्हणजे अगदी सॉक्रेटीसच्या मृत्यूनंतर सुद्धा पहिली पत्नी झान्थीपीनेच केले.
सॉक्रेटीसने मुलांच्या सर्व संगोपणाची जबाबदारी पत्नीवर टाकून स्वतःमात्र कुटुंबासाठी एक जबाबदारी म्हणून काही एक न करता आपल्याच एका वैचारिक विश्वात एका उच्चं ध्येयाने प्रेरित होऊन त्यातच ते रममान असत.
घरात जे मिळेल ते खाणे, प्रसंगी पत्नीच्या, मुलांच्या शिव्या खाण्याची सुद्धा तयारी असे. परंतु , प्रसंगी उपाशीपोटी राहून, तरुण युवापिढीच्या सानिध्यात राहून, घरात कमी पण बाहेर जास्त, त्यांना त्यांची समवयस्क मित्रमंडळी कमी होती. परंतु , त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या तरुण पिढीशी त्याने मैत्री जास्त घट्ट करून टीकवलेली होती. ती यासाठी की, त्यांची दूरदृष्टी सांगत होती की आजचा तरुणच उद्याचा एक जबाबदार नागरिक बनतो. म्हणून त्यांनी 20 ते 35 च्याच वयाच्या पट्टयातील तरुण शोधत त्यांना प्रश्न करत त्यांनाच त्यांची उत्तरे शोधायला लावत, सदविचारी आणि डोळस बणवत असत.
ही जी इतरांना सदविचारी बनविण्याची जी पद्धत त्यांनी वापरली. ती कदाचित भगवान बुद्धाच्या पहिल्याच सारनाथ येथील पाच भिखुना जो उपदेश होता तो हाच होता, की त्यांनी स्वतःच प्रश्न उपस्थित करायचे,त्यांची उत्तरे सुद्धा त्यांनीच आपल्या सदसदविवेक बुद्धीच्या माध्यमातून शोधून सत्य जाणायचे,आणि त्याला स्वीकारून आचरणातून सिद्ध व्हायचे.ही जी सदविचारी आणि डोळस बनण्याची पद्धत होती. हीच पद्धत सॉक्रेटीसने वापरलेली आहे.अर्थातच भगवान बुद्धाचे पहिले जागतिक वैचारिक वारसदार सॉक्रेटीस हेच आहेत. हे सिद्ध होते (हीच पद्धत संत गाडगेबाबानी सुद्धा अवलंबलेली आपण पाहतो )….
यावरून एक सिद्धांत पुढे आला.जो कोणत्याही काळात, कोणत्याही देशात लागू होतो.तो हाच की बहुसंख्यांक ( बहुजन ) समाजातील युवापिढीला जर जागृत केले,तरच देशाची खरी प्रगती होते. हाच सिद्धांत पुढे आला.
म्हणूनच ही संविधान जागृती सुद्धा सर्व तरुण युवक – युवतीसाठीच आहे.विशेष करून बहुजनातील युवापिढीसाठी…..
याच सॉक्रेटीसचा थोडक्यात जीवनप्रवास उद्यापासूनच्या पुढील भागात……
जागृतीचा कृतिशील लेखक…
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…



