Home Political गोंदिया -भंडारा- भाजपा जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेची बैठक उत्साहात संपन्न… — मा.खा.तथा...

गोंदिया -भंडारा- भाजपा जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेची बैठक उत्साहात संपन्न… — मा.खा.तथा गोंदिया जिल्हा निवडणूक निरिक्षक डॉ. अशोक नेते यांचे बैठकीत मार्गदर्शन….

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

       भारतीय जनता पार्टीच्या गोंदिया व भंडारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात आज साकोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीचे आयोजन जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून उत्साहात करण्यात आले.

     यावेळी मंचावर प्रामुख्याने उपस्थित असलेले भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व गोंदिया जिल्हा निवडणूक निरीक्षक मा.खा. डॉ. अशोकजी नेते,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मान. संजयजी भेंडे, माजी विधान परिषद आमदार गिरिशजी व्यास,भंडारा- जिल्हा निवडणूक निरीक्षक राजू पोद्दार,गोंदिया जिल्हाध्यक्ष अॅड. येशुलालजी उपराडे व भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाशजी बाळबुद्धे,या बैठकिचे संचालन गोंदिया भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाऊ अंजनकर यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

            बैठकीत मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, “भाजपा हा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत, याबद्दल सर्वांचे स्वागत व अभिनंदन!. 

      पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवताना जिल्हाध्यक्ष हा सर्वसमावेशक, मनमिळावू, न्यायप्रिय आणि संघटनेला समर्पित कार्यकर्ता असावा.तो भाजपा सक्रिय सदस्य असावा आणि वयोमर्यादेचे निकष पूर्ण करणारा असावा.”

   तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “चाचपणी व शिफारसीनंतर संबंधित नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जातील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल.”

     संपूर्ण वातावरणात उत्साह व संघटनात्मक ऊर्जा जाणवली. बैठकीच्या यशस्वी आयोजनामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.