Home सांस्कृतिक समादिठ्ठी वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम व निरोप समारंभ…

समादिठ्ठी वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम व निरोप समारंभ…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

        संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील पाली आणि बुद्धिझम विभागाच्या वतीने नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.रेखा वानखडे ह्या होत्या तर विशेष अतिथी म्हणून डॉ. नितीन कोळी आणि प्रमुख अतिथी प्रा.डॉ.संतोष बनसोड, प्रा.टी.बी. रामटेके, प्रा.डॉ.मेघा मून, प्रा.एस.अनोमदस्सी भंते, प्रा.सपना मेश्राम, प्रा.अनिता निर्गुळे, प्रा.कल्पना डोंगरे, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीकांत बनसोड, उपाध्यक्ष डी.व्ही. रोकडे मंचावर विराजमान होते.

         दरवर्षीप्रमाणे ‘समादिठ्ठी’ या वार्षिक अंकाचे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व तक्षशिला महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मंचावरील मान्यवर अतिथीच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अंकामध्ये ३० लेखकांचे वेगवेगळ्या विषयावर लेख आणि कविता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

        स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने गायन, काव्य, वकृत्व, प्रश्नमंजुषा, नाटिका व सुत्तपठण इत्यादीचा समावेश होता. स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वाल्मीक डवले यांनी, प्रास्ताविक सुरज मंडे तर आभार प्रदर्शन अँड. अरूण कांबळे यांनी केले. 

       या कार्यक्रमामधे ‘गाथा महामानवाची’ ही नाटिका विद्यार्थीनीं सादर केली.

      बुद्धिझम संपूर्ण विश्वाला तारणार आहे असे डॉ.नितीन कोळी विशेष अतिथी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

        विद्यापीठातील मानवी जीवनावश्यक शिक्षण देणारा पाली बुद्धिझम विभाग असल्याचे मनोगत प्रमुख अतिथी प्रा.डॉ.संतोष बनसोड यांनी व्यक्त केले.

        पाली आणि बुद्धिझम चे विध्यार्थी विविध उपक्रमात सहभागी होत असल्याचे बद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष रेखा वानखेडे यांनी समाधान व्यक्त केले.

        अखेर द्वितीय वर्ष चे सर्व विद्यार्थ्यांना पुष्प व पुस्तक भेट देवून त्यांना निरोप देण्यात आला. त्यामधे प्रामुख्याने प्रा.डॉ.श्रीकांत बनसोड़, प्रा.अशोक वानखडे, अविनाश गोंडाने, श्रीकृष्ण लांजेवार उज्वला इंगोले, सुजाता बनसोड, प्रज्ञा पर्वतकर, सुनंदा गवई, श्रद्धा जोशी, जया दांडगे, अमोल तांबे, प्रदीप काळबांडे, हरीश खरबडकर, मुकेश सरदार, अर्चना सुखदेवे, वैष्णवी बहादे यांचेसह सर्व विद्यार्थ्याच्या सहभाग होता.

        कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी इंजिनिअर उमेश शहारे, अँड. महेंद्र तायडे, अँड.अरुण रौराळे, अरुण रामटेके, शिवा प्रधान, लक्ष्मणराव कोरे, सविता रामटेके, अनिल हिरेखन, किरण शिंदे, रुपेश वानखडे, नीलध्वज कांबळे, संगीता मंडे, कुमुद गाडे, सिद्धार्थ गुडघे, संजय पांडे, रवींद्र अंबुलकर, निरंजन चिमूरकर, रूपाली कविटकर , निषाद वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभले. स्वरूची भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.