Home Maharashtra दर्यापूर तालुका व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार…

दर्यापूर तालुका व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार…

युवराज डोंगरे/खल्लार

       उपसंपादक 

         महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने शिक्षकांकरिता दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 ची पार पाडली. 

        दर्यापूर तालुक्यातुन अनेक शिक्षकांनी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्याचे नाव उंचावले त्यांचा सत्कार पंचायत समिती दर्यापूर येथे संतोष घुगे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या हस्ते करण्यात आला.

         यामध्ये इयत्ता 1ली 2 री भाषा मध्ये प्रथम क्रमांक चंचला घाटे, द्वितीय क्रमांक प्रकाश लिंगोट, तर तिसरा क्रमांक ज्ञानेश्वर सांगळे , तर इयत्ता 1व 2 गणित मध्ये प्रथम क्रमांक प्रविण जावरकर, तर दुसरा क्रमांक संगीता कोकाटे, यांचा आला तर इयत्ता पहिली दुसरी इंग्रजी मध्ये प्रथम क्रमांक प्रविण जावरकर, तर दुसरा क्रमांक वैशाली चांदूरकर, यांनी पटकाविला.

        गट 3 री ते 5 विषय भाषा मध्ये प्रथम किशोर बुरघाटे, तर द्वितीय क्रमांक अविनाश भोपळे तर तिसरा क्रमांक विजय शेगोकार यांनी पटकविला. इयत्ता 3 व 5 वी गणित मध्ये प्रविण जावरकर यांनी प्रथम क्रमांक पटकविला. परिसर अभ्यास 3 री ते 5 तसेच इयत्ता सहावी ते आठवी मध्ये भाषा तसेच गणित मध्ये मध्ये प्रथम क्रमांक प्रविण जावरकर यांनी पटकवीला. इयत्ता सहावी ते आठवी इंग्रजी मध्ये प्रथम क्रमांक रत्नाबाई राठी हायस्कूल च्या अश्विनी श्रीराम मोडक यांनी पटकवीला तर दुसरा क्रमांक प्रवीण जावरकर हानी पटकावीला. आणि सहावी ते आठवी विज्ञान मध्ये प्रथम क्रमांक प्रविण जावरकर यांनी पटकवीला असे दर्यापूर तालुक्यामधुन विविध विषयात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या शिक्षकांचा सत्कार प्रमाणपत्र, चेक, पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. 

           या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 3 म्हणून संजय अंभोरे तसेच केंद्र प्रमुख विनायक चव्हाण, राजेंद्र मालोकार, अनिल वांगे, रवींद्र राठोड,सुरेंद्र पतींगे, ज्ञानेश्वर सांगळे, डी. आर. जामनिक, अविनाश भोपळे, सतीश नांदणे,तसेच गटसमन्वयक सुनील स्वर्गीय उपस्थित होते.