रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गडचिरोली शहरात भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकात तीव्र आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यात देशातील विविध राज्यांतील जवळपास २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ६ महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये संतापाची लाट उसळली असून निदर्शनादरम्यान इस्लामिक दहशतवाद व पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. “इस्लामिक आतंकवाद मुर्दाबाद!”, “पाकिस्तान मुर्दाबाद!” या घोषणांनी चौक दणाणून गेला.
शहीद पर्यटकांच्या स्मृतीप्रती श्रद्धांजली वाहताना सर्व आंदोलनकर्त्यांनी काही क्षण मौन पाळले.हातात फलक व घोषवाक्य घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
या वेळी उपस्थित माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हणाले,”हा हल्ला एका व्यक्तीवर नाही,तर आपल्या देशाच्या एकतेवर आहे. धर्म पाहून हत्या करणे ही मानवतेच्या विरोधातली क्रूरता आहे.अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”ही केवळ दुःखद नव्हे,तर संतापजनक बाब आहे.असे मत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.
या वेळी “तुम जातीवाद से तोडोगे,हम राष्ट्रवाद से जोडेंगे!” अशा घोषणा देत समाजिक ऐक्य व राष्ट्रप्रेमाचा संदेशही देण्यात आला.
या निषेध आंदोलनात मा.खा.डॉ.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,माजी आमदार कृष्णाजी गजबे,जिल्हा संघ प्रचारक घिसुलाल काबरा, अ.भा.वि.प.चे नेते प्राचार्य धमेंद्र मुंनघाटे,बजरंग दलचे नेते विजय मडावी,विश्व हिंदु प.जिल्हाध्यक्ष सुशिल हिंगे,ओबिसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, कि.मो.प्र.सचिव रमेशजी भुरसे, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,आदिवासी मोर्चाचे प्र.जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे, कि.मो.जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, तालुकाध्यक्ष दत्तु सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजयजी सरकार, डॉ. चंदाताई कोडवते,माजी तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, शिवसेनेचे नेते राजुभाऊ कावडे, ता.महामंत्री बंडू झाडे,जिल्हा सचिव सुभाष गणपती,अभिलाश कुनघाडकर, प्रणय मस्के,राकेश राचमलवार यांसह शेकडो युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठया संख्येने सहभाग होता.
देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, केंद्र सरकारने या प्रकारावर कठोर भूमिका घेत दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.
पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले.



