उपक्षम रामटेके/शुभम गजभिये
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी,संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार तथा मार्गदर्शनाखाली,राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी गुजरातमध्ये “संघटन सृजन अभियान” अंतर्गत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष निवडण्याकरिता आणि संघटन मजबूत करण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेसचे (AICC) वलसाड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांची निवड केली होती.
या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी वलसाड जिल्ह्यातील वलसाड,उंबरगाव, पारडी- वापी, कपरडा,धरमपूर या तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते,पदाधिकारी,आणि नेतेमंडळी यांच्याशी संवाद साधून,चर्चा केली व त्याच्या भावना जाणून घेतल्या यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व गुजरात राज्य काँग्रेस कमिटीकडे सोपविणार आहेत.
गुजरात राज्यातील विधानसभा मतदारसंघातंर्गत पक्ष स्थिती मजबूत करण्यासाठी कार्यक्षम व संवेदनशील पक्ष पदाधिकारी असणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वाटते आहे.
यामुळेच गुजरात राज्यांतर्गत इमानदार,पक्षनिष्ठ,सतर्क, संवेदनशील,कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त्या केल्या जाणार आहेत.




