रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत तसेच कलावंतांच्या मानधन विषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी मा.खा.तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या सोबत चर्चा केली.
या भेटीदरम्यान मा.खा.डॉ. अशोक नेते यांनी गडचिरोलीतील एकलव्य विद्यालयाच्या प्रगतीबाबत चर्चा करत,आदिवासी भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधोरेखित केली.
तसेच त्यांनी जिल्ह्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलावंतांच्या समस्या मांडल्या.
प्रामाणिकपणे समाजप्रबोधनात्मक कार्य करणारे अनेक कलावंत आजही शासनाच्या मानधन योजनेपासून वंचित आहेत,ही बाब त्यांनी गांभीर्याने अधोरेखित केली.
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करताना,कलावंतांच्या सन्मान आणि त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.यासंदर्भात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदनही सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी अविशयांत पंडा हे जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी आणि विविध विकासात्मक निर्णयांमध्ये घेतलेली पुढाकाराची भूमिका यामुळे विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत.
या अनुषंगाने मा.खा.डॉ. अशोक नेते यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीवेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,सामाजिक नेते चंद्रशेखरजी भंडागे,कलावंत संघटनेचे अध्यक्ष धनपाल कार,तसेच विविध कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही सदिच्छा भेट केवळ प्रशासकीय संवादापुरती मर्यादित न राहता कलावंतांच्या हक्कासाठी एक प्रभावी पाऊल ठरली आहे.



