Home Social धानोरा तालुकातंर्गत येणाऱ्या मौजा मोहली येथील भाजप नेते नामदेवराव गावंडे यांच्या मुलीच्या...

धानोरा तालुकातंर्गत येणाऱ्या मौजा मोहली येथील भाजप नेते नामदेवराव गावंडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी मा.खा. डॉ.अशोक नेते यांची सदिच्छा भेट…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       धानोरा तालुक्यातील मौजा मोहली येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा तालुका उपाध्यक्ष नामदेवराव गावंडे यांच्या कन्येचा विवाह सोहळा दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. 

     या खास प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते हे काही महत्त्वाच्या बैठकीच्या कामकाजामुळे प्रत्यक्ष विवाह सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. 

             मात्र,आपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून त्यांनी गावंडे कुटुंबियांच्या निवासस्थानी मोहली येथे भेट देऊन नवविवाहित चि.सौ.कां.नैना हिला शुभाशीर्वाद दिले.या सदिच्छा भेटीत त्यांनी गावंडे कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.

     यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,व्याहाड बुज येथील भाजपा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र निकेसर,तसेच मोहली गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.