आपण केलेले सर्व कर्म आपल्याकडे वापस येत असतात. काही लोकांना नेहमी प्रश्न पडतो, मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही.मी कोणाबद्दल वाईट बोललो नाही वाईट वागलो नाही,तरीसुद्धा माझ्याबरोबर असे का होते,हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.या प्रश्नाचे उत्तर आपल्या कर्मामध्ये दडलेले आहे.
युनिव्हर्स मधील कर्माचा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे,आणि हे संपूर्ण कर्म वैज्ञानिक सिद्धांतावर कार्य करत असते.कर्म हे आपल्या श्वासाच्या गती प्रमाणे चालू असते,ज्या दिवशी श्वास थांबतो त्याच दिवशी आपलं कर्मही थांबते.
आपल्या मनामध्ये ज्या काही चांगल्या वाईट भावना उत्पन्न होतात त्याला सुद्धा कर्माचा सिद्धांत लागू आहे.आपल्या मनातील चांगले आणि वाईट विचार हावभाव हे युनिव्हर्स मध्ये आपोआप जमा होतात व जोडले जातात, जसे विजेचा तारेमध्ये वीज प्रवाह आहे.
परंतु तो वीज प्रवाह आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही,परंतु तो तारेमध्ये उपलब्ध आहे,कर्माचं कार्य हे विजेच्या तारेप्रमाणे कार्यरत असते.
आपल्या अज्ञानामुळे त्याची जाणीव आपल्याला होत नसते.
आपल्या अंतर्मनात उमटणारे सगळे चांगले आणि वाईट विचार,कर्माच्या विश्व बँकेमध्ये जमा होत असतात.
आपल्या मनामध्ये उमटणारा सगळ्या भावभावना या कर्माच्या सिद्धांताची निगडित असतात आपल्या.मनामध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेवल्यामुळे आपले मन व शरीर आरोग्यदायी बनते,चांगले विचार हे दुःखाच्या महासागरातून बाहेर येण्यास मदत करतात.
आपल्या कर्माचे प्रतिबिंब हे आपल्या कर्माच्या आरशामध्ये उमटत असतात,कर्माचा आरसा हा नेहमी पाण्यासारखा साफ ठेवावा.कर्माचा आरसा साफ ठेवण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात,ते घेतलेले सर्व कष्ट तुम्हाला जीवनामध्ये नेहमी चांगला मार्ग दाखवण्यास प्रेरित करतात.
चांगल्या आणि वाईट कर्माचे प्रतिबिंब आपल्या आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात.आपल्या मनातील चांगल्या व वाईट भावभावना ह्या सुद्धा आपल्या सुखदुःखास कारणीभूत असतात.जीवनातल्या सुखदुःखाचा शिल्पकार मनुष्य स्वतःच असतो.
आपल्या सुखदुःखासाठी आपण इतरांवर दोषारोप करणे अयोग्य असते.आपल्या सुख आणि दुःखाची परिभाषा हे आपले कर्मच ठरवत असतात.
कर्मावर नेहमी सजग असणं खूप गरजेचे असते,कर्म हे नेहमी तुमच्या श्वासावर भावनांवर अंतर्मनावर व बाह्य मनावर राज्य करत असते.आपल्या कर्माची विजेची तार ही त्या युनिव्हर्सशी कनेक्टेड असतात.
आपले आचार,विचार,भावभावना,ह्या आपल्या कर्माच्या तारेशी चोवीस तास कनेक्टेड असतात.ही कर्माची तार आयुष्यामध्ये कधीच डिस्कनेक्टेड होत नाही ती शेवटच्या श्वासापर्यंत कनेक्टेड असते.ज्या दिवशी श्वास थांबतो त्या दिवशी ती कर्माची तार आटोमॅटिक डिस्कनेक्ट होते.
ही अतिशय सर्वसाधारण प्रक्रिया असते ही प्रक्रिया सर्वसाधारण लोकांना समजत नाही.
फक्त ज्ञानी माणूसच त्या तारेला ओळखतो.कर्माची तार ही बुद्धांनी सांगितलेल्या कार्य कारणभाव या सिद्धांतावर कार्यरत असते.
कार्यकारणभाव म्हणजे विनाकारण कोणतीही घटना कधीच घडत नसते,घडणाऱ्या प्रत्येक घटनेला कार्यकारण भाव लागू असतो.
कार्यकारण भाव हा गौतम बुद्धाचा वैज्ञानिक सिद्धांत आहे.
बुद्धांचा हाच वैज्ञानिक सिद्धांत…
जगातल्या सर्व धर्मांनी कॉपी पेस्ट केलेला आहे.कार्यकारण भाव आणि कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . दोन शरीर परंतु जीव एक अशी ह्याची व्यवस्था असते.
ज्याला ही अवस्था समजते तो जीवनाच्या योग्य मार्गाला मार्गस्थ होतो.
सत्यमेव जयते.
दीपक जाधव...
संस्थापक,मानवता सत्य धर्म…
98 22 65 96 88



