Home देशविदेश निष्ठा आणि त्यांचा क्रम…

निष्ठा आणि त्यांचा क्रम…

       माणूस हा सामाजिक प्राणी आहे.कुटुंबात राहणे,समाजात वावरणे,अनेक सामाजिक संस्थात भाग घेणे,संघटित राहणे,स्वतःच्या आणि समूहाच्या काही रूढी परंपरा निर्माण करणे,त्या पाळणे या गोष्टी माणसाला आवडतात,त्या निवडीच्या पण वाटतात.भक्ती श्रद्धा निष्ठा या मानवी मनाची गरज आणि त्यातून मिळणारा आनंद आणि मानसिक संरक्षण याची अनुभूती माणसाला येते,म्हणून माणसाने देव धर्म देश प्रांत वंश जात भाषा आराधना लैंगिक संबंध या संकल्पना निर्माण केल्या🫢🫢आणि या संकल्पनांची निकड त्यास भासू लागली,म्हणून या गोष्टींचे तो पालन करू लागला.यातूनच देव धर्म वंश लिंग जात प्रांत भाषा या गोष्टी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले.इथपर्यंत ठिक आहे.परंतु या सर्व गोष्टींचा काही मूठभर अतिस्वार्थी म्हणजे लोभी आणि दुष्ट बुध्दीचे ,दुर्जन , वाइट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःचे वर्चस्व सिद्ध करणेसाठी आणि आपली सत्ता संपती प्रतिष्ठा जपण्यासाठी देव धर्म जात प्रांत भाषा लिंग या गोष्टीत भेद निर्माण केला.

        कारण यांचा मुळी भावच हा भेदाचा असल्यामुळे त्यांनी भेदभाव निर्माण केला,त्यामुळे विषमता निर्माण झाली.देव एकच असताना तो निर्गुण निराकार असताना,त्यास साकार रूप देऊन त्याच्या मुर्त्या प्रतिमा पुतळे तयार केले,आणि त्याची पूजा म्हणून कर्मकांड ची निर्मिती झाली,स्वार्थी लोकांनी ऐतखाऊनी देवाच्या मुर्त्या देवळे देवस्थाने निर्माण करून भोळ्या भाबड्या अडाणी लोकांची पिळवणूक लुबाडणूक करणे,अंधश्रद्धा पसरविणे सुरू झाले. एका देवाचे अनेक देव निर्माण केले,त्याचे पुत्र, दूत,अवतार म्हणून लोकांना खोटे बोलून मूर्ख बनविले.

       त्याची आराधना किंवा त्याच्याकडे नेणारा मार्ग एक वाट म्हणजे धर्म असे खोटे सांगून पुजारी पुरोहित बुवा बाबा बापू दादा यांनी बहुजनास लुटले.त्यांची आर्थिक नुकसान केली,स्वतःची घरे भरली.अजूनही ही ऐतखाऊ ची जमात लुटण्याचे काम चालूच ठेवले आहे.श्रमिक कष्टकरी बुद्धिजीवी कर्मचारी यांनी दिवसभर घराबाहेर राहून काबाड कष्ट करावे आणि देव धर्माच्या नावाने या ऐतोबाना पोसावे ,हा कसला न्याय ? हा कसला धर्म ? की अधर्म ?

     मनाची भूक म्हणून भक्ती श्रद्धा आणि बुध्दीची भूक म्हणून निष्ठा जरूर असावी.परंतु एकाच वेळी देव धर्म जात देश आणि मानवता यावरच्या निष्ठापैकी कोणती निष्ठा महत्त्वाची ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.याचे उत्तरही महत्त्वाचे आहे.कारण एकाच वेळी या सर्व गोष्टीवरची निष्ठा आपल्यापुढे दत्त म्हणून उभी असते , तेंव्हा श्रेष्ठ कनिष्ट काय ? उच्चनीच काय ? असा भेद करणे तर चुकीचेच आहे,योग्य अयोग्य निष्ठा असे वर्गीकरण करणे जरी महत्वाचे वाटत नसले तरी आणि देव धर्म जात पंथ भाषा लिंग वंश हा भेदभाव करायचा नाही असे गृहीत धरले तरी या गोष्टीवरील आपल्या निष्ठांना क्रम कसा द्यायचा ? क्रमवारी कशी करायची याचे तारतम्य विवेकशीलता असणे महत्वाचे आहे,अशावेळी सम्यकदृष्टी सम्यकभाव ,समातभाव पण कमीच पडतो,कारण प्राधान्य द्यायची वेळ येते त्यावेळी समता भाव आणि विषमता भाव पण कामी येत नाही.

       याचा अर्थ भाव भावना मन अशावेळी कामी येत नाहीत,तर अशावेळी प्रदन्याबुद्धी विवेकबुद्दीचा उपयोग करावा लागतो.कारण अशी बुद्धीच न्याय करते,म्हणून विवेकबुद्धी स न्याय बुध्दी म्हणतात.भेदभाव हा मनाचा स्वभाव असतो,म्हणून मन भेदभाव करते.बुद्धी मात्र योग्य व अयोग्य असे प्रथकरण वर्गीकरण करत असते,आणि विवेकबुद्धी न्याय द्यायचे काम करते.

       म्हणून देव धर्म जात लिंग प्रांत भाषा या सामाजिक गोष्टी ह्या मनाचे विषय असले तरी,जेंव्हा मन ( भावना ) भेदभाव करते ,तेंव्हा भेदभाव नाहिसा करून योग्य अयोग्य सत्य असत्य काय ते विवेकबुद्धी ठरविते.म्हणून देव धर्म जात प्रांत लिंग वंश या विषयात जेंव्हा भेदभाव विषमता.निर्माण होते ( केल्या जाते ) तेंव्हा मन म्हणजे भावनेने निर्णय न घेता विवेकबुद्दीने सारासार विचार करूनच निर्णय घेणे माणूसपणाचे आणि शहाणपणाचे ठरते.

  तेंव्हा या गोष्टींचा क्रम लावायचा तर असाच लावला पाहिजे.प्रथम प्राधान्य मानवता असेल,दुसरे प्राधान्य राष्ट्र,तिसरे धर्म चौथे प्रांत,पाचवे लिंग,सहावे वंश शेवटी देव.असाच क्रम देणे माणुसकीचे ठरते.कारण देव असो की धर्म,स्त्री असो की पुरुष,राष्ट्र असो की राज्य,हे सारे शेवटी कुणासाठी ? तर माणसासाठीच ना? या सर्वांचा केंद्रबिंदू माणूसच आणि त्याचे कल्याण हाच आहे.आणि माणसानेच या साऱ्या गोष्टी स्वतःच्या शांती समृद्धी साठी निर्माण केल्या आहेत.सुख शांती आनंद समाधान या चार गोष्टीसाठीच माणसाचा हा सारा खटाटोप आहे ना?

        म्हणून या सर्व गोष्टीत भेदभाव निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जर कुणी पाहिले प्राधान्य माणसास न देता म्हणजे मानवता या गोष्टीस न देता,मानवतावादाचा स्वीकार न करता,मानवता या सर्वसमावेशक कल्याणकारी तत्वाला डावलून प्रथम प्राधान्य कुणी राष्ट्र किंवा कुणी धर्म जात लिंग प्रांत अशा गोष्टीना देणार असतील तर ते अयोग्य चुकीचे अमानवीय असणार आहे.राष्ट्र धर्म देव या पेक्षा मानवता श्रेष्ठ आहे,हे जो पर्यंत आपल्या डोक्यात बसणार नाही,तो पर्यंत जाती धर्म लिंग वंशाचे विषाणू पासून होणारा आजार कमी होणार नाही.या आजाराने च सर्वांना मरण येणार आहे.यावर औषध एकच ” मानवता , मानवता धर्म,माणुसकीचा व्यवहार,आणि माणूस ही एकच जात.

       लेखक : दत्ता तुमवाड..

          सत्यशोधक समाज नांदेड..

दिनांक : 23 एप्रिल 2025.फोन : 9420912209.