उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव मारोती देवस्थान ते कोटगाव,पिंपळगाव,डोमा ते नागभिड या मार्गावर मटेरियल टाकणारा ट्रक आज सकाळी पलटी झालाय.पलटी झालेल्या ट्रकचा क्रमांक एम.एच.४०,सि.टी.३६२२ असा आहे.
पलटी झालेल्या ट्रक चे फोटो घेण्यासाठी पत्रकार उपक्षम रामटेके थांबले असता त्यांना पलटी ट्रक चे फोटो घेण्यास सदर ट्रक चालकांनी मनाई केली व तिथल्याच एका मजूरांनी अपंग असलेल्या व्यक्तींला मारहाण केली असल्याचा धक्कादायक तथा थरारक असा अनुचित प्रकार घडलाय.
एस.एम.एस.कंपनी मध्ये ट्रक चालक (मजूर) व्यक्तीने भर रस्त्यात एका अपंग व्यक्तींला मारहाण करणे हे कोणत्या मानुष्कित आणि कोणत्या कर्तव्यात मोडते यावर एस.एम.एस.कंपनीचे संचालकांनी सांगतीले पाहिजे.
अपंग व्यक्तींचे नेतृत्व करणारे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडे यांच्या कडे अपंग व्यक्तींना करण्यात आलेल्या मारहाणीचे प्रकरण पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.
याचबरोबर जांभुळघाट ते कोटगाव मार्गाने ओव्हरलोड मटेरियल भरलेले ट्रक,हायवा नेले जात असल्याने सदर मार्गाची ऐशीतैशी होत आहे.याकडे चिमूर सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंता लक्ष देतील काय?हा मार्मिक प्रश्न मौजा कोटगाव वासियांचा त्यांना आहे.
याचबरोबर मौजा जांभुळघाट ते कोटगाव मार्गाने ओव्हरलोड मटेरियल भरलेले ट्रक,हायवा अति वेगाने चालवित असल्याने आवागमन करणाऱ्या प्रवाशांना भयंकर त्रास होतो आहे.तद्वतच या मार्गाने आवागमन करणाऱ्या प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे भिसी पोलिसांनी वेगाने चालविणाऱ्या वाहणाकडे जातीने लक्ष द्यावे असे आग्रही आवाहन मौजा कोटगाव वासियांचे आहे.



