शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यात अग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक आहे. त्याचबरोबर आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी हा ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
यातून शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ घेता येणे शक्य होणार असून, बनावटगिरीला आळा बसणार आहे.
पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत गेल्या तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत. तसेच पीएम किसान सन्मान योजनेतही बनावट अर्ज येत आहेत. यावर तोडगा म्हणून कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी हा ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
कृषी विभागामार्फत सर्व पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाइन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्या संबंधित माहिती म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके, या प्रणालीशी एपीआयद्वारे अॅग्रिस्टॅक आवश्यक कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
पार्सल यांचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे. महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे. कृषी योजनांच्या लाभासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गतशेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने ठरविले होते.
सुरुवातीला केवळ पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा क्रमांक बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता सर्वच लाभाच्या योजनांसाठी हा क्रमांक बंधनकारक राहणार आहे.
वंचीत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यासाठी चिमूर महसुल विभाग तर्फे गावोगावी शेतकऱ्यांना सोयीचे होईल यासाठी गावोगावी फार्मर ( आयडी ) काढण्याचे शीबीर लावले जात आहेत.याचा लाभ शेतकरी घेत असतानी दिसत आहेत.
खांबाडा,उसेगांव येथे शेकडोच्या वर शेतकऱ्यांनी या शिबीरीत आपली फार्मर (आयडी) काढून घेतली.यावेळी खांबाडा साज्यांचे तलाठी एस.एस.कांबळे , ग्रामसेवक पटले, पोलीस पाटील संजय गायकवाड , कोतवाल जगन्नाथ चाफले, शेतकरी लक्क्षण सावसाकडे , श्रीरामे अन्य काही शेतकरी शिबीराप्रसंगी उपस्थित होते.



