Home Maharashtra पक्ष मजबूतीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची चिमूरला झाली आढावा बैठक संपन्न? —...

पक्ष मजबूतीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची चिमूरला झाली आढावा बैठक संपन्न? — राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉ.अविनाश वारजूकर,आमदार अभिजित वंजारी,यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीला विशेष उपस्थिती.. — इमानदार पत्रकारांवर चिमूर तालुका अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याचा मुद्दा सुध्दा बैठकीत चर्चेचा महत्त्वपूर्ण विषय ठरला…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

    चिमूर तालुकातंर्गत काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे आणि त्याच्या मजबुती करीता नेहमीच मदत करणार आहे.चंद्रपूर जिल्हातंर्गत संपूर्ण 15 तालुक्यात सभा आयोजित करण्यात येणार आहेत,यानंतर काँग्रेस पक्षच वाढणार आहे.मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत पक्षात घेऊ नका आणि जे पक्षात आहेत ते नेहमीच राहतील असे व्यक्तव्य चंद्रपूर जिल्हा निरिक्षक तथा आमदार अभिजित वंजारी यांनी केले.

         माजी आमदार तथा माजी खनिकर्म महामंडळ अध्यक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉक्टर अविनाश वारजूकर यांनी चिमूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असून परत काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत तळागाळातील मतदारांपर्यंत,शेतकऱ्यांपर्यंत,युवकांपर्यंत,महिला भगिनीं,युवती,पर्यंत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पोहोचून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतील यावर भर दिला.

      माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा मतदारसंघ समन्वयक,राष्ट्रीय काँग्रेस पक्षातंर्गत ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर,महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे संघटक धनराज मुंगले, राष्ट्रीय सेवादलाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा.राम राऊत, चंद्रपूर जिल्हा महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,आणि इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विविध मुद्द्यांवर बोलताना ठासून सांगितले.

            आजच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत चिमूर तालुक्यातील इमानदार पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी स्थानिक अधिकारी सक्रिय झाले असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

       तद्वतच इमानदार पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास विधानपरिषदेत मुद्दा लावून धरु असे आश्वासन आमदार अभिजित वंजारी यांनी बैठकीत सांगितले असल्याचे बोलले जात आहे.

                आजच्या बैठकीला चंद्रपूर जिल्हा निरिक्षक अभिजित वंजारी,चिमूर विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र महासचिव डॉ.अविनाश वारजूकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा मतदारसंघ समन्वयक डॉ.सतिष वारजूकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे राज्य संघटक धनराज मुंगले,चिमूर तालुकाध्यक्ष विजय गावंडे,चंद्रपूर जिल्हा महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बूटके,सेवादलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.राम राऊत,अनू सुचित जाती विभाग चिमूर तालुकाध्यक्ष लोकनाथ रामटेके,माजी पंचायत समिती उपसभापती स्वप्निल मालके,जेष्ठ नेते अरविंद रेवतकर,भावना बावनकर,विलास पिसे,रहमान पठाण,आदीं अनेक पदाधिकारी उपस्थित आढावा बैठकीला उपस्थित होते.