Home देशविदेश प्रथम काश्मीर घाटीतील पाकिस्तानी पुरस्कृत अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध…..   वैचारिक...

प्रथम काश्मीर घाटीतील पाकिस्तानी पुरस्कृत अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध…..   वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ सर्वसामान्य भारतीय जनतेसाठीच….

     “या विश्वात अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्म माणसासाठी आहे( धर्मासाठी माणूस नव्हे) . प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान हे माणसाला माणूस बनविण्यासाठीच त्या त्या धर्मसंस्थापकांनी तयार केलेले आहेत. असे असतांना हाच मानव माणसामाणसात भेद निर्माण करून क्षुल्लक कारणांसाठी,फुटकळ स्वार्थासाठी,कोरड्या उपद्रवी अहंकारापोटी माणूसच माणसाचा वैरी का झाला?

      स्त्रीच एका स्त्रीची शत्रू का झाली?प्रत्येकजण आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ अट्टाहासाने पटवून देण्यात स्पर्धा का निर्माण करतो?

       जेंव्हा आपल्याच धर्माच्या तत्वज्ञानानुसार आचरण करण्याची वेळ स्वतःवर येते…

      तेंव्हा हाच मानव मौन धारण करतो. अथवा त्याचा (जातीचा, पंथाचा,संपतीचा ) कोरडा स्वार्थी अहंकारी धर्म त्याचा अविष्कारीत होऊन त्याच मानवाचा दानव का बनतो?

     हा प्रश्न माझ्यासारख्या असंख्य विचार करणाऱ्यांना निश्चितच पडल्यावाचून राहत नाही.

      परंतु ,या संदीग्ध प्रश्नाचे उत्तर किंवा कारण कदाचित केवळ दोनच असू शकतील.

     एक धर्मसंस्थापकांनी या विश्वात मानवाला,माणूस बनण्यासाठीच तत्वज्ञान स्वतः तसे आचरण करून बनवले….

      परंतु,पुढे काळाच्या ओघात त्यांच्या वैचारिक वारसदारांनी किंवा धर्म प्रसारकांनी सर्वसामान्य जनता आणि मूळ तत्वज्ञान यात पडदा ( स्वार्थी अहंकारातून निर्माण झालेला ) निर्माण केला. आणि सर्वसामान्य जनतेला मूळ मानवी तत्वज्ञानापासून, भरकटवले, किंवा तसे आचरण करण्यासाठी भाग पडू दिले नसेल.!

        किंवा दुसरे कारण हे असेल की, दोन किंवा अनेक धर्मामध्ये एकरुपता जर आली तर याच मानवातील दानवाला आपले काय?

    प्रश्न सतावत गेल्यामुळे ही समस्या निर्माण झाली.

      परिणामी संत ज्ञानेश्वरांना “अवघे विश्वची माझे घर…….”

    साने गुरुजींना ” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे… “

       प्रेषित महमद पैगंबरांनी ” प्यासे को पानी और भूखे को खाना देना. यही धर्म है….. “

     अशा अनेकांनी आपापल्या धर्मातून मानवता धर्माकडे जाण्याचा अंगुलिनिर्देश केलेला दिसतो आहे….

     याचाच अर्थ असा स्पष्ट आहे की, या सर्व धर्मांपेक्षा सर्वश्रेष्ठ हा मानवता धर्मच आहे.हे सिद्ध झाले.

      आता या मानवता धर्माच्या दिशेने जाण्यासाठी, माणसाने प्रगती करण्यासाठी निसर्गवादाकडे जाणे भाग आहे. कारण निसर्गवादातूनच या मानवताधर्माची निर्मिती झालेली आहे.कारण मानवताधर्म हा केवळ माणसासाठीच मर्यादित नसून तो संपूर्ण सजीवसृष्टीचे निर्जीवसृष्टीच्या साहाय्याने कसे करता येईल आणि तसे करायला भाग पाडणारा हा धर्म आहे…

       आणि या धर्माकडे वळण्यासाठी विज्ञानवादाच्याच शिडीचा डोळसपणे वापर केल्याशिवाय शक्यच नाही.

      म्हणून सोळाव्या शतकापासून जो विज्ञानवाद उत्क्रांत होत गेला. तोच पुढे…..

     विज्ञानवादी + विवेकवादी= मानवतावादी विश्व् निर्माण व्हायला पाहिजे होते.परंतु ,तसे होऊ शकले नाही.हे वास्तव आहे.

          याचे कारण सुद्धा हेच आहे की,जेंव्हा या विवेकवादी,विज्ञानवादी अर्थात मानवतावादी शास्त्रज्ञानी कार्यकारणभावाच्या सिद्धांताला आदर्श मानून गेल्या 500 वर्षात जी वैज्ञानिक क्रांती केली.त्या क्रांतिशिवाय आमचे पान सुद्धा हालत नाही.त्याच्याशिवाय आम्ही श्वास सुद्धा घेऊ शकत नाही.थोडक्यात त्याशिवाय आम्ही जगू सुद्धा शकत नाही.पण त्याचा वापर सुद्धा आम्ही माणसं मारण्यासाठी करतो. त्याचा वापर आम्ही इतरांपेक्षा श्रीमंत कसे हे दाखवण्यासाठी करतो….

     एवढेच नव्हे….

     हसंपूर्ण विश्वाला तिसऱ्या जागतिक अणू युद्धात संपविण्यासाठी करतो.

    कोणतेही शास्त्रज्ञ त्यांचे संशोधन मानवतेच्या कल्याणासाठीच करतात……

      परंतु,त्याचा वापर करणारे मानवातील दानव आणि दानवी व्यवस्था त्यांच्या तत्वज्ञानाची चिरफाड करून आपल्या कोरड्या स्वार्थी अहंकाराचे त्यात अतिक्रमण करतात.आणि सर्वसामान्य जनतेला त्यांना हतबल करून वेठीस धरतात.

    वरील सारांशातून एक गोष्ट प्रकर्षाने सिद्ध होते की, या विश्वात दोनच शक्ती आहेत.एक विवेकवादी + विज्ञानवादी = मानवतावादी………

दुसरी……

     साम,दाम दंड आणि भेदावर आधारलेली कुटनीती ज्यांच्या एकमेकांच्या संघर्षामुळे या विश्वात क्रांती आणि प्रतीक्रांतीची लाट आली जीची सुरुवात आर्याच्या उत्पतीपासून झाली..

        ही कुटनीती,विश्वात,प्रत्येक खंडात,प्रत्येक देशात,प्रत्येक राज्यात,समाजासमाजात,कुटुंबाकुटुंबात,घराघरात,एवढेच काय एका शरीराचे / हृदयातील विवेकशक्तीला कायमचे मारून टाकून त्याचे दोन घाव करण्यास ही कुटनीती मागेपुढे पाहत नाही!

       याचाच अर्थ स्पष्ट आहे की,या हृदयातून,या परिवारातून,या समाजातून, राज्यातून,देशातून,या खंडातून,या विश्वातून,आपापल्या धर्मातून कायमचे कुटनीतीला संपवणे.हेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे…

   आणि सर्वांनी मिळून मानवताधर्माच्या दिशेने मार्गक्रमण करूया…. 

       ज्या मानवताधर्माचा पवित्रग्रंथ,”भारताचे संविधान आहे,ज्याची निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे…..

म्हणूनच संविधान जागृती देशाची प्रगती…..

       आता दररोज ही वैचारिक तुलनात्मक लेखमाला तुमच्यातील विवेकाला जगविण्यासाठीच….

      जागृतीचा कृतिशील लेखक

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…‌