शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
कंत्राटदार मेसर्स गुप्ता कंन्ट्रक्शन नागपूर हे शेतकरी आंदोलन करीत असलेल्या ठिकाणी पोहोचले व गिरोली ते माकोना रस्त्याचे बांधकाम दोन दिवसांत सुरु करणार आणि सदर रस्त्याचे बांधकाम लवकरच पुर्ण करणार असल्याची हमी दिली.
यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
चिमूर तालुकातंर्गत मौजा माकोना ते गिरोली पांदन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी दोन्ही गावांतील शेतकरी भर उन्हात धरणे आंदोलन करण्यासाठी आज बसले होते.
गेल्या ४० वर्षांपासून माकोना ते गिरोला शेतीच्या रस्त्यासाठी शेतकरी मागणी करत आहे.मात्र मागणी पुर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग काम करण्यास लाबंवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.
त्यामुळे जिव गेला तरी चालेल अश्या विचाराने आत्मदहन आंदोलन रस्ता बांधकाम करण्यासाठी उभारण्यात आले होते.
सदर आंदोलनकर्त्यांनी सांगितले की कामाला सुरुवात झाली तरच आंदोलन मागे घेण्यात येणार,अन्याथा उन्हात जिव गेला तरी चालेल आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याच्या भुमिकेवर आंदोलन कर्ता ठाम होते.
मात्र,सदर रस्ता बांधकाम कंत्राटदार स्वतः आंदोलन स्थळी आले व दोन दिवसात बांधकाम सुरू करण्याची हमी दिली.यामुळे सध्यास्थित आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका कार्याध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम यांनी केले होते.त्यांचे सोबत सहकारी शेतकरी बांधव चंद्रकांत पिपंळकर,विनोद धोटे,पवन बोबडे,लोकेश धोटे,पवन डोईजड,सुरेखा शेंबेकर,लिलाबाई पेद्राम,ज्योती कावळे,पुष्पा कावळे,विठ्ठल पिंपळकर हे आंदोलनत सहभागी झाले होते.



