रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे व्यसनमुक्ती व शिष्यवृत्ती योजना यावर कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रफुल्ल बनसोड हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद शास्त्रनकार प्रभारी अधीक्षक रा.तू.महाविद्यालय चिमूर हे होते.
माननीय विनोद शास्त्रकार यांनी शासनाच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात विविध योजनांची माहिती या कार्यशाळेत दिली. डॉ. प्रफुल्ल बनसोड सर यांनी व्यसन व व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती योजनांच्या संदर्भात माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक तथा मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. कार्तिक पाटील यांनी तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पितांबर पिसे सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समान संधी केंद्राचे प्रभारी प्राध्यापक प्रो.डॉ. हरेश गजभिये यांनी केले. संचालन डॉ. प्रफुल राजुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आशुतोष पोपटे यांनी केले.
या कार्यशाळेला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे, डॉ. लक्ष्मण कामडी तसेच मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.



