शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
ताडोबा सफारी करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या गाडी समोर अचानक रानडुक्कर आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या हेतूने चालकांचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी वाहनाचा भयंकर अपघात झाला.
हा अपघात चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा गोंडमोहाळी फाट्याजवळ सकाळी ६ वाजताच्या दरम्यान झालाय.
पर्यटक ताडोबा सफारी करण्यासाठी सिरकाडा गेटवर जाणार होते तेवढ्यात गंभीर अपघात झाला.
चारचाकी वाहन कुठले आहे आणि कुणाचे आहे हे अजूनपर्यंत कळले नाही.मात्र या अपघातात पर्यटकांना दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे.
याचबरोबर रानडुक्कराचा अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.



