Home Maharashtra डोमा येथील आशावर्करचे अमानुष्य कृत्य,गर्भवती महिलेच्या पोटावर व गुप्तांगावर केली मारहाण…‌

डोमा येथील आशावर्करचे अमानुष्य कृत्य,गर्भवती महिलेच्या पोटावर व गुप्तांगावर केली मारहाण…‌

 अबोदनगो चव्हाण…

अमरावती जिल्हा प्रतिनिधी…

     दखल न्युज भारत…

         तक्रारदार यांच्या घरी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना आरोपी यांनी पाणी सोडले.यामुळे तक्रारदारांच्या शौचालयाचे बांधकाम खराब झाले.या संबंधाने तक्रारदार हिच्या पतीनी संबंधित पाणी सोडणाऱ्यांना हटकले असता आरोपींचा राग अनावर झाला आणि त्यांनी गरोदर असलेल्या तक्रारदार महिलेला विविध ठिकाणी मारहाण केली असल्याचा गंभीर प्रकार घडलाय.

           अमरावती ग्रामीण जिल्हातंर्गत पो.स्टे.चिखलदरा हद्दीत ग्राम डोमा येथील तक्रारदार सौ.राणी अजय अथोटे,वय २५ वर्ष हिने तक्रार दिली की, दि.१६/०४/२०२५ रोजी ती व तिचे पती नामे अजय बन्सी अथोटे हे त्यांचे घरातील जागेवर संडास बांधण्याकरिता खोदलेल्या गड्यात सिमेंट काँक्रीटचे काम मजूरांकडून करुन घेत असतांना त्यांच्या शेजारी राहणारे काका सासरे नामे बबलु जगलाल अथोटे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या सिमेंट कामावर नालीच्या पाईपमधून पाणी सोडल्याने बांधकाम खराब झाले.

            म्हणून तक्रारदार यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी तक्रारदार यांनाच शिविगाळ केली.तसेच बबलु जगलाल अथोटे,त्याची पत्नी संध्या,मुली खुशी व चीकु यांनी,तक्रारदार महिलेस ओढतान करुन मारहाण केली.

      त्यात तक्रारदार महिला ही जमीनवर पडल्याने दगड लागून तीचे दोन दात तुटले.तक्रारदार हिचे पती यांना सुध्दा विट व काठीने मारहाण करुन जखमी केले.

        यादरम्यान तक्रारदार हिच्या गळ्यातील सोण्याची पोत तुटून तेथेच कोठेतरी गहाळ झाली असल्याचे तीने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे.

             तक्रारदार महिला ही तीन महिन्यांची गरोदर आहे.सदर मारहाणी दरम्यान तिच्या गर्भास इजा पोहचल्याने तीला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय,अचलपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

       तिची प्रकृती स्थिर असून वैद्यकिय अधिकारी,अचलपूर यांचे देखरेखी खाली पुढील उपचार सुरु आहेत.

      तक्रारदार हिचे तक्रारीवरुन आरोपी नामे १) बबलु जगलाल अथोटे,२) सौ.संध्या अथोटे,३) कु.खुशी अथोटे,४) कु.चीकु अथोटे सर्व रा.डोमा ता. चिखलदरा यांचे विरुध्द कलम ११७ (२),११८ (१), ११५ (२),३५२, ३५१ (२) भा.न्या.सं. प्रमाणे पो.स्टे.चिखलदरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून चिखलदरा पोलीस तपास करीत आहेत. 

       एकंदरीत प्रकरणाचे अनुषंगाने शांतता असून पिडीत हिची प्रकृती स्थिर आहे.तिचेवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहे.