Home Social कोरची तालुक्यातील मौजा मोहगाव येथे आदिवासी कवर समाजा तर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचे...

कोरची तालुक्यातील मौजा मोहगाव येथे आदिवासी कवर समाजा तर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचे करण्यात आले होते आयोजन…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी.. 

      गडचिरोली जिल्ह्यातील मौजा मोहगाव ता.कोरची येथे आदिवासी कवर समाज यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

         या विवाह सोहळ्या प्रसंगी चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ. नामदेव किरसान,आमदार रामदास मसराम,काँग्रेसचे निरीक्षक ऍड.सचिन नाईक व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

            यावेळी मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष कोरची,नितेश राठोड युवक काँग्रेस अध्यक्ष,रजनीकांत मोटघरे अनुसुचीत जाती जिल्हा अध्यक्ष,मिलिंद खोब्रागडे तालुका अध्यक्ष आरमोरी,राजेंद्र बुल्ले तालुका अध्यक्ष वडसा,अमर भरे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष,बिंदूलाल फुलकवर अध्यक्ष कवर समाज,मेघराज कपूर प्रमुख मार्गदर्शक,भरत दुधनांग संचालक,नसुरुद्दीन भामानी तालुका अध्यक्ष भा.कोरची,गणेश सोनवाने नायब तहसीलदार कोरची,सौ.हर्षलताताई भैसारे नगराध्यक्षा,अमर भर्रे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष,गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.