Home Social आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांनी दिल्ली गंगासागर हेटी येथील वाघाच्या हल्यात ठार...

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांनी दिल्ली गंगासागर हेटी येथील वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मारुती सखाराम बोरकर यांच्या घरी सांत्वनस्पर भेट…. –आमदार भांगडिया यांच्या हस्ते वन विभागाने दिली 9 लाख 50 हजार रु. आर्थिक मदत…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

तळोधी (बा). शहरातील गंगासागर हेटी येथे 15/4/2025 ला सकाळी 06:30 सुमारास मोहफुल गोळा करायला गेलेल्या मारोती सखाराम बोरकर यांच्या वर दबा धरून बसलेल्या वाघाने हाला केला.या हल्यात ते जागीच ठार झाले होते. 

            आज दि. 18/4/2025 रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनस्पर भेट घेतली.यावेळी वन विभागाने 9,50,000/- रु. आर्थिक मदत आमदार बंटीभाऊ यांच्या हातून बोरकर यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली. 

        यावेळी वन अधिकारी कर्मचारी,भाजपा पदाधिकारी,स्थानिक गावकरी व सहकारी उपस्थित होते.