Home Social प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिनव उपक्रमाचे आयोजन…   — रक्तदान शिबिराचे आयोजन… ...

प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिनव उपक्रमाचे आयोजन…   — रक्तदान शिबिराचे आयोजन… — तथा नेत्रदान, देहदान व अवयव दान याच्यावर जनप्रबोधन…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

           एक अभिनव पण स्तूत्य उपक्रम बल्लारपुरातील पाटील परिवाराने नुकताच राबवला. साधारणता आरोग्य शिबिर, हेल्थ चेक अप कॅम्प, रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम सामाजिक अथवा राजकीय संघटना याद्वारे राबविण्यात येतात.

       व्यक्तिगत स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन साधारणता करण्यात येत नाही. परंतु बल्लारपुरातील विद्यानगर, पाली बौद्ध विहार जवळ राहणारा पाटील परिवार याला अपवाद आहे. या परिवारातील विलास पाटील या सदस्यांचे मागच्या वर्षी 16 एप्रिल ला आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांची स्मृती जागविण्यासाठी या परिवाराचे जावई मोहन रामटेके आणि त्यांचे मित्र प्रशांत देवगडे राहणार नागपूर यांनी पुढाकार घेऊन यानिमित्ताने रक्तदान शिबिर आणि देहदान नेत्रदान, अवयवदान यावर जनप्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले.

          हेल्पिंग हॅन्ड टीम वन चंद्रपूर आणि पाटील परिवाराने संयुक्तपणे शासकीय रक्तपेढी चंद्रपूर च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन रामटेके यांनी केले. प्रशांत देवगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन केले. कार्यक्रमात हेल्पलाइन हेल्पिंग हॅन्ड टीम वन हे मुख्य संयोजक प्रदीप अडकिने यांनी रक्तदान आणि देहदान यावर मार्गदर्शन केले.

        भास्कर भगत यांनी तथागताची दान परिमितेचे महत्व अधोरेखित केले तर संपत कोरडे यांनी रक्तदानासारख्या सामाजिक कार्यक्रमाचे महत्त्व काय आहे हे सांगून असे कार्यक्रम वारंवार आयोजित करण्याची गरज आहे असे आपल्या मनोगतामध्ये नमूद करून पाटील परिवाराचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.

         यावेळी प्रशांत देवगडे, ईश्वर काळे, मोहन रामटेके, भास्कर भगत, अनुज मोहूर्ले, युवराज अलोणे, यश जयकर, निलेश भालेराव, कार्तिक नथुराम गोडसे, मयूर वाढई, हरिवंश जगतवार, पियुष वसाने, रौनक ठाकूर, अमन चहारे, श्रेयस पाटील, जसबीर सिंग, आकाश फुलझेले, मोहन कौरासे, संकल्प ढवळे आणि जय चौधरी या विभिन्न जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

         शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुरातील शासकीय रक्त संकलन चमूने या कार्याला सहकार्य केले. डॉ. दीक्षा मेश्राम, वैष्णवी गुजर, राकेश शेंडे, सोनू मरसकोल्हे, गायत्री पाटील, ब्रदर दुर्गादास, अमरदीप आणि धीरज दानव या शासकीय रक्तसंकलन चमूने रक्त संकलन केले. पाटील परिवारातील रिंकू आणि राणू तथा रामटेके परिवार नागपूर आणि जुलमे परिवार राजुरा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

         स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल पाटील परिवाराचे जन माणसात कौतुक होत आहे.