बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
तालुक्याचे स्थळ असलेल्या पंढरपूर येथे सालाबाद प्रमाणे विश्वकर्मा पंचाळ सुतार सामाजिक संस्था सोलापूर द्वारे वधू वर परिचय पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला उध्दघाटक म्हणून आमदार प्रशांत परिचालक,तर अध्यक्ष म्हणून माजी आमदार संजय रायमुलकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
रविवार दिनांक 20/4/ 2025 रोजी,सकाळी 9 ते 5 या वेळे पर्यंत वधू-वर व पालक परिचय मेळावा पंढरपूर येथे होणार आहे.
परिचय मेळाव्याचे मुख्य ठिकाण,”न्यू सातार संकुल रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर असे आहे.सदर ठिकाणी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक विश्वकर्मा पंचाळ सुतार सामाजिक संस्था सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सुतार (सर ),जिल्हा उपाध्यक्ष नरसिंह सुतार,सोलापूर जिल्हा संघटक मधुकर सुतार,पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सुतार यांच्यासह सर्व पंढरपूर तालुक्यातील सुतार समाज बांधवांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न होणार आहे.
यासाठी हजारोच्या संख्येने अनेक जिल्ह्यातुन सुतार समाज बांधव यांनी आपली उपस्थिती लावून वधु-वर पालक परिचय मेळाव्यात नोंदणी करून आपल्या पाल्यांना जोडीदार मिळवून द्यावा,हीच काळाची गरज आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे.
राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटक आमदार प्रशांत परिचारक असणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष (मालक) माजी आमदार संजय रायमुलकर हे असणार आहेत.
याचबरोबर प्रदेश अध्यक्ष अखिल विश्वकर्मा सुतार समाज गणपतराव गायकवाड,अध्यक्ष अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे हनुमंतराव पांचाळ,चंद्रकांत गवळी,डॉ. बसराज सुतार,क्रांती नाना माळेगावकर,विष्णू कबीर महाराज,हेमंत धावड,दिलीप पाटील,सुभाष मस्के सर,सत्यजित कुमठेकर,या प्रमुख अतिथीसह सर्वांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा संपन्न होणार आहे.
या वधु-वर सुचक पालक परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाच ते दहा हजाराहून अनेक सुतार समाज बांधव आपली उपस्थिती लावून वधु-वरास हा मेळावा जोडीदार मिळवून देणार असल्याचे सर्वच स्तरावर सुतार बांधवांमध्ये चर्चा होऊ लागली आहे.



