शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणी करीता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांना चिमूर येथील विविध संघटनांनी चिमूर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिले आहेत.
विविध संघटनात पतंजली योग समिती चिमूर,संत जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूर,संत तुकाराम महाराज कुणबी समाज बहुउद्देशिय संस्था चिमूर,माँ मानिका देवी सेवा समिती चिमूर,श्री.गुरुदेव सेवा मंडळ चिमूर,व्यापारी असोसिएशन चिमूर,भाजप महिला आघाडी चिमूर,शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चिमूर,अखिल भारतीय बौद्ध महासभा चिमूर,भाजप अनुसूचित आघाडी चिमूर या सामाजिक संघटनानी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांना दिले.
निवेदन देत असताना विविध संघटनातंर्गत पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यात राजु देवतळे,राजु पाटील झाडे,मनिष तुंम्पलीवार,प्रशांत चिडे,सचिन फरकाडे,रमेश कंचर्लावार, गजानन शिंदे,सागर भागवतकर,जयंत गौरकर, अरुण लोहकरे,डॉ सुरेश लाखे,हरीश सारडा,प्रविण सातपुते,राकेश बघेल,अभिजीत बेयते,सौं मायाताई नन्नावरे,गीताताई लिंगायत,छायाताई कंचर्लावार,भारती गोडे,समिना शेख,दुर्गाताई सातपुते,विना जिवतोडे आदी उपस्थित होते.






