शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
सिरोंचा तालुक्यातील मौजा अंकिसा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था ची निवडणूक माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातंर्गत सिरोंचा तालुक्यातील समस्त कार्यकर्ते यांच्या मेहनती द्वारे एकजुटीतून सोसायटीच्या पूर्ण उमेदवारांचा दणदणीत विजयी झाला.
आज दिनांक 16/06/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीत आदिवासी विकास विविध सेवा सहकारी संस्थेच्या 05 जागेसाठी निवडणूक झाली.
यात सर्वसाधारण 02 जागा,इतरमागस वर्ग 01 ,एससी 01, एनटी 01 असे 5 जागेसाठी लढत झाली आणि एसटी 07 उमेदवार बिन विरोध निवडून आले.सदर मतदान बॅलेट पेपर ने झाले असून उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत काही वेळेपुरते बंद झाले होते.पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवडणुक शांततेत पार पडली.
4.00 वाजता मत मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली.यात शेतकरी सहकारी पॅनल सतीश गांजीवर बाजार समिती अध्यक्ष,व भंडारी श्रीहरी उपाध्यक्ष व विजयी झालेले उमेदवार नागेंद्र चिटकेशी,मनोहरअरिगेला,प्रवीण अकुला,कार्तिक जंगम,पल्लंम मारालू,यांचा दणदणीत विजयी झाला.विरोधी पक्षाचे एकही उमेदवार जिंकले नाही.
यावेळी विजयी झालेला उमेदवारांच अभिनंदन करुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी,सय्यद सालार, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व गावकरी नागरिक उपस्थित होते.



