Home देशविदेश भांडण,मारामारी,हिंसा…

भांडण,मारामारी,हिंसा…

          सुरुवात भांडणाने होते,त्याचे रूपांतर मारामारीत,आणि पुढची स्टेप म्हणजे लास्ट स्टेप हिंसा असते.

         या तीन गोष्टी दोन व्यक्तीत किंवा दोन समूहात घडतात.हे कौटोंबिक म्हणजे कुटुंबात म्हणजे आई वडील आणि मुले,नवरा बायको,भाऊ भाऊ यांचेत आणि सामाजिक भांडण म्हणजे दोन समूहात म्हणजे जातीची भांडणे किंवा दोन धर्मांची भांडणे.

       भांडण का होते ? त्याची कारणे कोणती ? आणि त्यावरचे उपाय कोणते ? याचा पण शोध घेतला पाहिजे.आधी कारणांचा शोध घेऊ.

      ढोबळ कारणे दोन.

1)भौतिक कारणे…

2)माणसाचा स्वभाव प्रवृती..

A) भौतिक कारणे पुढील प्रमाणे 

    1.सत्ता ,संपती,प्रतिष्ठा…

          या तिन्ही गोष्टी मुळे भांडणे होतात,मारामाऱ्या आणि हिंसा होतात.या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.जसे की,सत्ता ही संपती असेल तरच मिळते,संपती ही सत्तेमुळेच मिळते,याच प्रमाणे सत्ता आणि संपती असली तरच प्रतिष्ठा मिळते.याचा अर्थ मूळ संपती आहे,संपती म्हणजे उत्पादनाची साधने जसे की,जमीन कारखाने,कंपनी,व्यापार,उद्योग,ज्यातून पैसा मिळतो अशी साधने,आणि सोने,धनसंपत्ती म्हणजे खनिजच्या खाणी.यातून पैसा मिळतो,पैशातून ही संपत्तीची साधने उभी राहतात.साधने आणि पैसा एकमेकास पूरक आहेत.पैसा आणि साधने म्हणजे संपती मिळवण्यासाठी सत्ता कामी येते.संपत्तीचे संरक्षण ,मालमत्तेचे ,आणि मालकाच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी पण सत्ता उपयोगी असते,कारण सत्तेच्या हाती कायदा आणि पोलिस,सैन्य,प्रशासन असते.हे मालकांचे आणि त्याच्या मालमत्तेचे संरक्षण करीत असतात.लोकशाहीत पण असेच असते.

2.कुटुंब व्यवस्था…

हे पण भांडणाचे कारण आहे.भांडण नाही असे एकही कुटुंब नाही.शेताचे, घराचे,उद्योग कारखाने,दुकानांचे भावभावती ल वाटणी ची भांडणे,धूर्यबंधाऱ्याची भांडणे,सासू सून,भाऊ बहीण , आई वाडीला सोबत मुले यांची भांडणे ही भौतिक आणि स्वभाव गुणामुळे असतात,ती इतक्या विकोपाला जातात की,भांडणाचे रूपांतर मारामारी आणि एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत पोहचतात.

3.समूहाची भांडणे…

म्हणजे दोन जाती किंवा दोन धर्मातील भांडणे.ही भांडणे होण्याचे कारण एकच,ते म्हणजे जातीचा अभिमान,धर्माचा अभिमान आणि निष्ठा आणि अस्मिता.यामुळे माणसे माणुसकी विसरतात,प्रेम ,आपुलकी,सहकार्य,बंधुभाव,सर्वधर्म समभावाची भावना,एकमेकांचा आदर करणे,प्रतिष्ठा जपणे,एकमेकांचे मानवी हक्क म्हणजे स्वातंत्र्य जपणे,न्याय,समता हे सारे माणुसकीचे गुण ,मानवतेचा धर्म विसरतात आणि जातीसाठी माती खाण्यास तयार होतात,धर्मासाठी अधर्म करतात.म्हणूनच भांडणे ,मारामाऱ्या,हिंसा घडतात.माणसांच्या कत्तली होतात.

B) स्वभाविक मानसिक कारणे 

 1).सारी माणसे सारखी नसतात.स्वभावाने काही रागीट तर काही शांत असतात,काही लोकांत विकृती असते.मोह लोभ अहंकार द्वेष मत्सर अशा काही विकृती ची माणसे त्यांना शांतता नको असते.ते दुर्गुणी माणसे नसली तरी भांडणे उकरून काढतात,असलेली वाढवितात, आग विझवण्या ऐवजी त्यात तेल ओतून ती भडकवितात.लावलावी,करतात.यांना ” विघ्नसंतोषी लोकं” असे म्हणतात. विघ्न निर्माण करण्यात अशा लोकांना समाधान वाटते.याचा अर्थ यांच्या मेंदूतच काहीतरी बिघाड असतो.जे सद्गुणी असतात त्यांचा मेंदू ठीक असतो.आणि जे दुर्गुणी आणि विकृत असतात त्यांचा मेंदू बिघडलेला असतो,म्हणून अशा लोकांना मनोरुग्ण म्हणतात.यांना दया माया प्रेम क्षमा शांती न्याय निती म्हणजे काय ? हे माहीतच नसते.असले तरी अशा गोष्टींचा ते हेवा करतात,द्वेष करतात.विरोध करतात.हे स्वतःच बिघडलेले असतात,म्हणून दुसऱ्यांना पण बिघडवण्याचे काम करतात. उघडवितात.चांगल्या गोष्टीना मोडा घालतात.याचे कारण यांची मानसिकता.असे लोकच भांडणे मारामाऱ्या हिंसा करतात,असे केल्याशिवाय यांना आनंद शांती मिळत नाही.याकरिता अशा लोकांसाठीच कायदा , जेल आणि वेड्या ची इस्पितळे असतात.

2.)वाईट सवयी: म्हणजे दारू,जुगार,व्याभिचार, चोरी,गुन्हेगारी, वाईट संगत अशा काही गोष्टी मुळे पण भांडणे होतात,त्याचे रूपांतर मारामारी हिंसेत होते.

      आपण कारणे परिणाम पाहिलेत,आता यावर उपाय काय ,? हा खरा प्रस्न आहे.याचे उत्तर असे की,ज्या कारणाने जे परिणाम घडतात,ती कारणे नष्ट करणे,ती कारणे नष्ट कशी करायची ? तर कारणांचे मूळ शोधायचे,आणि ते मूळ नष्ट करायचे.म्हणजेच कारणांचे मूळ भौतिक परिस्थिती असेल तर ती बदलावी लागेल,तिला पर्याय द्यावा लागेल.तसेच कारणाचे मूळ मानसिक असेल तर मन बदलावे लागेल,विचार बदलावे लागतील.

   विचार बदलला की मन बदलते,आणि मन बदलले की ,कृती आणि माणसाचा व्यवहार बदलतो.व्यवहार म्हणजे त्याचे वागणे बोलणे राहणे सवयी इत्यादींत बदल दिसून येतो.म्हणजेच आधी भौतिक परिस्थिती बदलावी लागेल,ती मानसिक स्थिती बदलेल.

      भांडणे त्यातून मारामाऱ्या त्यातून हिंसा याची उत्पती, कारणे,परिणाम आणि उपाय यावर या लेखात चर्चा केली.यावर वाचकांनी माझ्या 9420912209 या वॉट्स अप नंबरवर प्रतिक्रिया द्याव्यात,विनंती,की जेणे करून माझे विचार मला दुरुस्त.करता येतील.

     लेखक : दत्ता तुमवाड

      सत्यशोधक समाज नांदेड

         दिनांक : 17 एप्रिल 2025

              फोन : 9420912209.