शुभम गजभिये…
विशेष प्रतिनिधी…
भिसी येथील शिवाजी पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेज या ठिकाणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना कार्यकर्ता शिबीर उत्तम प्रतिसादात पार पडले.
तसेच या कार्यक्रमाला खालील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.नितेशरावजी उघडे (संस्थापक,शिवाजी पब्लिक स्कूल भिसी) हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.ज्ञानेश्वरजी शिरबाय्ये (प्राचार्य, शिवाजी पब्लिक स्कूल भिसी) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. अशोकरावजी शेळके (माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र धनगर समाज महासंघ) हे आवर्जून उपस्थित होते.
या शिबिराचे सूत्रसंचालन श्री. दीपक उघडे (मल्हारसेना उपाध्यक्ष यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. श्रीकांत शेरकी (जिल्हाप्रसिद्ध प्रमुख,महाराष्ट्र धनगर समाज महासंघ,चंद्रपूर) यांनी केले.
या कार्यकर्ता शिबिराला गणेशजी भुरके,परसरामजी उघडे,लक्ष्मण शेरकी,यशवंत तुरारे,विक्की कांढरकर,कुणाल खवसे,सुनील खवसे,विनोद खवसे,सौ.सपनाताई उघडे,लताताई उघडे,आदी धनगर समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्ता शिबिराला शेकडो समाज बांधव उपस्थित होते.यामुळे कार्यकर्ता शिबिर यशस्वी ठरले.



