Home देशविदेश दोन नाबलीक मुलींवरच्या लैंगिक अत्याचारांनी चिमूर हादरले…. — अत्याचारांचा टायर जाळून...

दोन नाबलीक मुलींवरच्या लैंगिक अत्याचारांनी चिमूर हादरले…. — अत्याचारांचा टायर जाळून निषेध.. — जमावातील काहींनी दगडफेक केल्यामुळे पोलिस स्टेशनचे ग्लास फुटले तर एका महिला शिपाईताईला दगड लागला असल्याची वास्तव घटना…. — नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून चिमूरकरांचा पोलिस स्टेशनवर रेटा,आरोपींना वेळीच अटक… — अनुसूचित घटना घडू नये म्हणून चिमूरात तगडा बंदोबस्त,बंदोबस्तासाठी बाहेरुन पोलिसांची आणि सुरक्षाबलाची कुमक दाखल…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       चिमूर शहरातील दोन नाबालीक मुलींवर लैंगिक अत्याचारांची घटना समोर आल्यांने अख्ख्ये चिमूरवासीय हादरले असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी रात्रोलाच मोठ्या प्रमाणात चिमूरकरांनी चिमूर पोलिस स्टेशन गाठले होते.

          मात्र,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा,अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक रिना जनबंधु,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निरीक्षक संतोष बक्काल यांनी वेळीच दोन्ही अत्याचारी तरुणांना अटक केली.दोन्ही आरोपी अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजाचे आहेत.

         लैंगिक अत्याचारांच्या घटनांतंर्गत प्रकरण चिघडू नये यासाठी ठाणेदार संतोष बक्काल यांनी वेळीच सतर्कता बाळगली होती.

            मात्र आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून रात्रोच्या वेळी पोलिस स्टेशन चिमूर येथे चिमूरकरांचा रेटा एवढा वाढला होता की,त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना बरीच दमछाक झाली.

         चिमूर पोलिस स्टेशन मध्ये जमलेल्या जमावाला शांत करीत समजावून सांगत असतांनाच जमावातील कुणीतरी व्यक्तींनी दगडफेक केली.यामुळे पोलिस स्टेशनचे ग्लास फुटले तर महिला शिपाई ताईला एक दगड लागल्यामुळे जमाव पांगवण्यासाठी शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला,या लाठीचार्ज मध्ये दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.

   आरोपी              

         या घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिमूर पोलिसांनी सतर्कता बाळगत पोलिसांच्या विविध ठिकाणांहून १० कुमक बोलावण्यात आल्या आहेत.आज चिमूरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

      आरोपी 

         चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष बक्काल प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

       सध्या चिमूरात असंतोष युक्त शांतता आहे.