रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे समान संधी केंद्रादारे सामाजिक समता पर्वाचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत महात्मा फुले यांची१९८ वी जयंती निमित्त अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य कॅप्टन डॉ. प्रफुल्ल बन्सोड होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले यांच्या समग्र कार्यावर प्रकाश टाकला. महात्मा फुले यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सावित्रीबाई फुले सहभागी झाल्या. महात्मा फुले एक विचार आहे तो विचार वर्तमान काळात प्रत्येकांनी आत्मसात करावा असे सांगितले. वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.नितिन कत्रोजवार होते.
त्यानी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले कसे घडले. त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था, शाळा सामाजिक कार्य, ग्रंथसंपदा, उद्योगपती महात्मा फुले, एक साधारण व्यक्तीमत्व ते महात्मा पर्यंतचा प्रवास विशद केला. डॉ.कार्तिक पाटील, प्रा.पितांबर पिसे, डॉ.राजेश्वर राहांगडाले, डॉ.लक्ष्मण कामडी, डॉ.उदय मेंढूलकार प्रा. आशुतोष पोपटे, प्रा.वर्षा सोनटक्के, प्रा.शितल वानखेडे, प्रा.रुपाली बरडे, प्रा.अमर ठवरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समानसंधी केद्रांचे समन्वयक डॉ. हरेश गजभिये, प्रास्ताविक डॉ.प्रफुल राजुरवाडे आभार कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.राकेश कुमरे यानी केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यानी उदंड प्रतिसाद दिला.



