ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : श्री.सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी तर्फे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्रात घेण्यात आली.
साकोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ येथे दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी रूंजी सुधाकर संग्रामे या मुलीला 200 पैकी 200 गुण मिळाले आणि ती महाराष्ट्रात प्रथम आली.यामुळे महामाया महिला बहुउद्देशीय सामाजिक न्याय संघटना मार्फत तिच्या शाळेत जाऊन संस्थेतर्फे भेटवस्ते देत कुमारी रूंजी चा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डी.जी.रंगारी,महामाया संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष शितल नागदेवे,महाराष्ट्र सचिव मृणाली कोल्हे,उत्तमा गडपायले,शाळेचे शिक्षक पूजा देशपांडे,केंद्रप्रमुख नगराळे मॅडम,आशा वलथरे,उमेश भस्मे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
त्या मुलीचा बॅग व पुष्पगुच्छ देऊन सर्व समक्ष सत्कार करण्यात आला.डी.जी .रंगारी यांनी भाषणामध्ये सांगितले की स्पर्धेच्या युगात मुलांच्या टिकाऊपण कठीण गोष्ट आहे.त्यामुळे मेहनत,अभ्यासाची चीकाटी व आई वडिलांच्या मार्गदर्शन व शिक्षकांच्या मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.सोबतच मिळून ह्या सर्व गोष्टी जर असल्या तर व्यक्ती किंव्हा विद्यार्थी प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो.
भविष्यात मुलगी उच्चस्त पदावर जाईल अशी अपेक्षा भाषणातून डी.जी.रंगारी सर यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष शीतल नागदेवे यांनी सुद्धा खरंच या मुलीचा आदर्श घेण्यासारखा आहे,दुसऱ्या वर्गाची मुलगी साकोली सारख्या शहरातून प्रथम येऊन आमच्या साकोलीचा नावलौकिक केला हे आमच्यासाठी अभिनंदनास व गौरवास पात्र आहेत,सर्व मुलां – मुलींनी आदर्श घ्यावा असे मत संस्थेचे अध्यक्ष शीतल नागदेवे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भस्मे सर यांनी केले तर आभार कुमारी पल्लवी लुथडे मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गणेश गजभिये,लताताई इलापाते व इतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



