ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एस.बोरकर सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. के.जी.लोथे, प्राध्यापिका स्वाती गहाणे, के.एम.कापगते ,एम.एम.कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्रांगणात डी.एस.बोरकर सर यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भगवान महावीर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित भाषणे सादर केले. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य इत्यादी महाव्रतांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विशद केले, त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे वातावरण भक्तीमध्ये झाले होते.
डी.एस.बोरकर सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, भगवान महावीर यांच्या शिकवणुकीचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, महावीर यांनी जगाला शांती आणि सद्भावनेचा संदेश दिला, त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शाचे पालन करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवावेत असे मौलिक विचार ठेवले.
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांना अल्पपोहार वितरित करण्यात आले, तसेच विद्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले, त्यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. एकंदरीत विद्यालयात महावीर जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भगवान महावीर यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या शिकवणीबद्दल माहिती मिळाली तसेच त्यांच्या विचारांना आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे संचालक आर.व्ही. दिघोरे सर, तर आभार प्रदर्शन राजेश बी.कापगते सर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता डी.डी. तुमसरे, डी.आर.देशमुख, आर.सी.बडोले, एस.आर. देशमुख, एम.व्ही.कामथे, आर.के.खोटेले,एल.एस. गहाणे, कु. एम.आर. शिवणकर, बी. टी. मंगलमारे, जी.बी.न्यामुर्ते इत्यादी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.



