Home Crime पिपर्डा नदीच्या वाळू घाटावर जाणारा रस्ता जेसीबीद्वारे खोदला.. — रेतीची तस्करी...

पिपर्डा नदीच्या वाळू घाटावर जाणारा रस्ता जेसीबीद्वारे खोदला.. — रेतीची तस्करी रोखण्यासाठी चिमूर तहसीलदरांचे कर्तव्यदक्ष पाऊल..

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

    चिमूर तालुक्यातंर्गत नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला लगाम लावण्याच्या बाबत चिमूर तहसीलदार श्रीधर राजमाने सतर्क झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिपर्डा नदी घाटाकडे जाणारा रस्ता जेसीबीद्वारे खोदला आहे. 

       यामुळे आता वाळू चोरी साठी वापरणारे वाहने वाळू घाटावर जाऊ शकत नाहीत.परिणामी रेतीतस्करांचे वाळू चोरीचे मनसुबे आता थंडबस्त्यात पडणार आहेत.

      चिमूर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही अनेक ट्रॅक्टरमालक अवैध वाळू तस्करी अंतर्गत बिनधास्त व्यवसाय करायचे.

       यामुळे चिमूर तहसीलदारांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.ही पथके रात्री गस्त घालत आहेत.

     रेतीघाटांची प्रक्रिया रखडल्याने एकीकडे रेतीची चोरी वाढली आहे,तर दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्यासाठी वाळूचा तुटवडा निर्माण होणार नाही यासंबंधीने तहसीलदार यांना दक्ष राहावे लागणार आहे.

        रेती अभावी अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम थांबणार नाही यासाठी लोकहितोपयोगी वाळू धोरण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने अंमलात आणले आहे.

     वाळू चोर रेतीची खुलेआम तस्करी करत असताना अनेकदा महसूल व पोलिस विभागांनी वाळू तस्करांवर कारवाई केली आणि दुर्लक्ष सुध्दा केले होते.

         अवैध वाळू उत्खननाबाबत सोशल मीडियाच्या पत्रकारांनी प्रकरण सातत्याने उचलून धरले.यामुळे तहसीलदार श्रीधर राजामाने यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगाव ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शुभम बदकी,कोतवाल प्रदीप पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी भक्तदास कोहचाडे यांनी नवी शक्कल लढवत पिपर्डा नदी घाटावर जाण्याचा रस्ताच जेसीबीने खोदला.

       याचबरोबर चिमूर तालुक्यात भरारी पथकाच्या माध्यमातून वाळू चोरांना आळा घालण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे.