Home Maharashtra राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची संयुक्त बैठक ठाणे ला..‌....

राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची संयुक्त बैठक ठाणे ला..‌. — १८ तारखेला बैठकीचे आयोजन.‌…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची संयुक्त बैठक दिनांक १८ एप्रिल २०२५ ला आयोजित करण्यात आली असल्याचे पत्रक राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष इंजिनिअर जगदीश लबाडिया यांनी सार्वजनिक केले आहे.

        ठाणे येथे होणाऱ्या राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या बैठकीत विविध प्रकारच्या समस्यांवर गंभीर चर्चा केली जाणार आहे.

       याचबरोबर महाराष्ट्र सरकारने,काम केलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांचे देयके दिले नसल्याने यावर सुध्दा आवश्यक चर्चा बैठकीत केली जाणार आहे.

        या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील राज्य अभियंता संघटनेचे पदाधिकारी व सदस्य,तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पदाधिकारी व सदस्य हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

      चंद्रपूर जिल्हातंर्गत राज्य अभियंता संघटनेच्या आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी १८ एप्रिल ला होणाऱ्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर जगदीश लबाडिया,जिल्हा महासचिव इंजिनिअर ओंकार उपलंचिवार यांनी केले आहे.