Home Crime बबलू जाधव भरारी पथकाच्या रडारावर… — वाळू भरलेल्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई..

बबलू जाधव भरारी पथकाच्या रडारावर… — वाळू भरलेल्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई..

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

          चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि महसूल विभागाचे भरारी पथक सजगतेने कार्यरत असून काल रात्रोला बबलू जाधव यांचा वाळू भरलेला ट्रॅक्टर पकडून भरारी पथकाने पंचनामासह ट्रॅक्टर जप्तीची कारवाई केली.

         ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३४,सि.डी.९३६८ असून सदर ट्रॅक्टर द्वारे नेरी परिसरातील उमा नदीच्या पात्रातून वाळू चोरुन नेली जात होती.

       नेरी – सावरगाव मार्गाने भरधाव वेगात वाळू भरलेले ट्रॅक्टर जात असताना सापळा रचून भरारी पथकाने त्या ट्रॅक्टरला अडविले.

       भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार देविदास निकुरे,मंडळ अधिकारी चिडे, तथा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सदरची ट्रॅक्टर जप्तीची कारवाई केली असून ट्रॅक्टर चिमूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.