Home Social श्रीराम जन्मोत्सवानिमित्त उद्योजक पोपट सुतार परिवाराच्या भेटीला सौ.सारीकाताई भरणे यांची उपस्थिती… ...

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त उद्योजक पोपट सुतार परिवाराच्या भेटीला सौ.सारीकाताई भरणे यांची उपस्थिती…  — पोलीस निरीक्षक दिनकर शिरसागर (सुतार) यांचा सौ. सारिका ताई भरणे यांच्या हस्ते सन्मान… 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

             पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील किराणा मालाचे उद्योजक पोपट बाबुराव सुतार यांच्या परिवाराच्या वतीने सालाबाद पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

           या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सारिकाताई दत्तात्रय भरणे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

          श्रीराम जन्मोत्सव निमित्त सारिकाताई भरणे यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच सौ.सारीकाताई भरणे यांचा पोपट सुतार परिवाराच्या वतीने सौ. सिमा पोपट सुतार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व हार देऊन सन्मान करण्यात आला,

           यावेळी सौ.सारिकाताई भरणे पुढे बोलत असताना म्हणाल्या की माझा शेतकरी राजा सुखी समृद्धी होऊ दे. निसर्ग राजा कडकडून पाऊस पडू दे. शेतकरी राजा सुखाने जीवन जगू दे श्रीराम जन्मोत्सवा निमित्त श्रीरामाला सारिका ताई भरणे यांनी साकडे घातले.

            तोंडले तालुका माळशिरस येथील सुतार समाजाचा विद्यार्थी दिनकर अंकुश शिरसागर (सुतार) हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील परीक्षेत पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सन्मान पिंपरी बुद्रुक येथील पोपर बाबुराव सुतार परिवाराच्या वतीने सौ सारिका ताई भरणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार देऊन सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीस सारिका ताई भरणे यांनी शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील इस्कॉन टेम्पलचे व्हॉइस प्रेसिडेंट श्रीमान धनुर्धर अर्जुन दास यांनी आपली उपस्थिती लावून सर्व राम भक्तांच्या उपस्थितीत प्रवचन सांगण्यात आले.

            तसेच माळीनगरचे भजनी मंडळ यांनीही आपली उपस्थिती लावून टाळ व मृदुंगाच्या आवाजात श्रीराम भजनाचे गायन करण्यात आले.गेली 35 वर्षापासून श्रीराम जन्मोत्सव हा सुतार परिवाराच्या वतीने पोपर बाबुराव सुतार यांच्या सहकार्याने साजरा करण्यात येत असतो.

           या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौ.सारिका ताई दत्तात्रय भरणे, साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, पैलवान सुनील बोडके, बबनदादा बोडके,पोलीस पाटील वर्धमान बोडके,तोंडले गावचे मा.सरपंच पांडुरंग सुतार, बाळासाहेब घाडगे, आबासो बोडके,प्रवीण बोडके,केशव बोडके, आशोकआबा बोडके, पांडुदादा बोडके ,श्रीमंत पडळकर सर, दत्तुनाना बोडके, आशोक वाळेकर, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी राजपूत, शरद बोडके, नाथा रुपनवर, संदिपान पडळकर , ज्ञानदेव नरुटे, गोपाळ नरुटे, सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पोलीस अधिकारी कळसाईत साहेब सह असंख्य भविक व कार्यकर्ते उपस्थित होते.

           शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश सुतारे यांनी केले.