युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वक्फ बोर्डाच्या बिल सुधारणा संदर्भात खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी अरविंद सावंत यांना बाळासाहेब ठाकरे असते तर काय वाटले असते असे म्हटले पण त्या अगोदर जर शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टिका करतांना अगोदर आपण कुठे असतो हा विचार केला का? असा प्रश्न शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमरावती महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ अलका निलेश पारडे यांनी खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांना केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर मागिल दोन वर्षांपासून जे शिंदे गटाचे नेते व ज्या नेत्यांबद्दल आपण बोलत आहात त्यातील एकही घटना घडली नसती किंबहुना कोणाची करायची हिंमतच झाली नसती,मागिल दोन वर्षांपासून ह्या शिंदे गटाच्या नेत्यांचे विचार ऐकून त्यांची कीव येते की उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बिमारीचा फायदा घेऊन भाजपाला सोबत घेऊन कट रचला तो पण बाळासाहेब ठाकरे नसतांना? शिवसेना पक्ष घेतला,चिन्ह मिळवून घेतलं,शाखा वर कब्जा केला, बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेले खासदार,आमदार घेतले जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्ही हे करू शकले असते का? तुमच्या जीभ एवढ्या वडवड केल्या असत्या का?मर्सिडीज दिल्यावर पद मिळतात असे बोलू शकल्या असत्या का?असा प्रश्न सौ. अलका निलेश पारडे यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप वेळ बोलतात की माझ्याजवळ बोलण्यासारखे खूप आहे मला बोलायला लावू नका? मग एकवेळच बोलून दाखवा ना की तुमच्याजवळ काय आहे ते? महाराष्ट्र मधील जनतेला माहिती होऊ द्या तुमच्या जवळ काहीच नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टिका करणे आहे आणि एवढच जर तुमच्यामध्ये स्वाभिमान व हिंमत आहे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता,यांचे फोटो न लावता व राज ठाकरे यांच्या सारखा नविन पक्ष काढून निवडणुका लढवून दाखवा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमरावती महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.अलका निलेश पारडे यांनी केले आहे.



