शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील पोस्टे भिसी अंतर्गत काल दिनांक 05/04/ 2025 रोजी PSO जितेंद्र चांदे,सा.पो.नि.रवींद्र वाघ,पोउप नि.शुभांगी पाटील,पोलीस स्टेशन भिसी येथील 10 कर्मचारी तसेच 20 सैनिक यांचे उपस्थितीत आगामी रामनवमी,हनुमान जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सन उत्सव कार्यक्रम शांततेत पार पडावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता भिसी टाऊन तसेच शंकरपूर चौकी मध्ये रूट मार्च घेण्यात आला.
तसेच शंकरपूर चौकी येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव,हनुमान जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शंकरपूर हद्दीतील शांतता कमिटी तसेच श्रीराम नवमी जन्मोत्सव, हनुमान जयंती,तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष,सचिव सदस्य यांच्या उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली.
सदर मिटिंग मध्ये पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी दिलेल्या सूचना तसेच त्यांच्या अडीअडचणी बाबत विचारपूस करून योग्य मार्गदर्शन शांतता सभेमध्ये करण्यात आले..



