Home सांस्कृतिक सांस्कृतिक कार्य संचालनालयामुळे भीसी गावात आचार्य विनोबा भावे यांचे साक्षात दर्शन. ...

सांस्कृतिक कार्य संचालनालयामुळे भीसी गावात आचार्य विनोबा भावे यांचे साक्षात दर्शन. — सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनतेत जनजागृतीचा संदेश.

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

      चिमूर तालुकातंर्गत भिसी येथील लहाने सभागृहात आयोजित सांस्कृतीक कार्य संचालनालय मुंबईच्या वतीने आचार्य विनोबाजींचा संदेश व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला. 

       या कार्यक्रमात गायक विद्यानंद सरदार आणि संगीत संच अमरावती यांनी आचार्य विनोबाजींच्या जीवनावर प्रभावी गीते सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. 

       विनोबाजींचे एक पात्र नाटक सुप्रसिद्ध नाटक कलावंत विजय घाटोळे सौंसर यांनी सादरीकरण केले.त्यांनी केलेल्या वेशभूषा बघून आश्रमातून येऊन साक्षात विनोबाजींचे दर्शन झाले.असे उपस्थित जनतेत बोलल्या जात होते.विनोबाजींचा संदेश त्यांनी या नाटकातून जनतेला दिला.

      कार्यक्रमाचे सुरुवातीला महाराष्ट्र गीत सादर करून पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कलावंत शंकरराव रामटेके तर उद्घाटक धनराज वाळके हे होते.तर अतीथी रतीरामजी डेकाटे,पुंडलिक गुरनुले,श्रीकृष्ण नन्नावरे,गायिका वृंदाताई मेश्राम,मीराताई काळे,उपस्थित होते. 

       कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लालाजी शेंडे,मोतीराम कांबळे,दशरथ रामटेके,जयराम शंभरकर,पौर्णिमा रामटेके,वैभव नागले,शाहीरा जया बोरकर,देविदास दडमल आदी असंख्य रसिकांची उपस्थिती होती. 

       या कार्यक्रमाचे समन्वयक भारती जांभूळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवटी सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले व अश्या प्रकारचे नवनवीन कार्यक्रम परिसरात पहिल्यांदा झालेला असल्याचे जनतेत चर्चा होत होत्या.