Home सांस्कृतिक चंद्रपूरच्या तरुणाने साकारलेल्या गाण्याची पंतप्रधानांकडून स्तुती…

चंद्रपूरच्या तरुणाने साकारलेल्या गाण्याची पंतप्रधानांकडून स्तुती…

       रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

नागपूर :- चंद्रपूर येथील संगीतकार धीरेंद्र मुलकालवार यांनी साकारलेल्या माधव नेत्रालयाच्या कुळगीताची प्रशंसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागपूर येथे माधव नेत्रालयाच्या उद्घाटन प्रसंगी मोदीजींनी या गाण्याचा उल्लेख करत त्यातील काही ओळी उद्धृत केल्या आणि त्याचा आशय उपस्थितांना समजावून सांगितला.

        धीरेंद्र मुलकलवार हे चंद्रपूर येथील असून सध्या मुंबईत संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचा संगीतप्रवास विलक्षण आहे. त्यांनी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘आर्टिकल १५’, आणि ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ यांसारख्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे.

          ‘उरी’च्या पार्श्वसंगीताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे, तसेच ‘ट्यूजडे ’ या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या लघुपटासाठी त्यांनी आपल्या संगीत दिले आहे. माधव नेत्रालयासाठी त्यांनी विशेषतः दोन गाणी संगीतबद्ध केली होती, हे कुळगीत उद्घाटन सोहळ्यात सादर करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या गाण्याची स्तुती करताना त्यातील विचारसरणी आणि शब्दांकनाचे कौतुक केले.

         या ऐतिहासिक क्षणी धीरेंद्र मुलकलवार स्वतः उपस्थित होते. आपल्या सर्जनशील कार्याला देशाच्या सर्वोच्च नेत्याकडून मिळालेल्या या मान्यतेमुळे त्यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.