सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा..
हिगणघाट :– आजोबा आपल्या विवाहित मुलगीव नातीसह नागपुरु वरुन दुचाकीने हिगणघाटला परत येत असताना बुटिबोरी जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला..
यात आजोबांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी व नातिन यांना उपचारासाठी नेत असताना त्यांच्याही मृत्यु झाला.या दुर्देवी घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार गीरड येथील श्री.पुनिराम एनुरकर हे 28 एप्रिल ला आपल्या नातलगाच्या साक्षगंध कार्यकर्मासाठी नागपुर येथे गेले होते.तेथे साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपुन ते आज 29 एप्रिल रोजी आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. 32, ए.एम.1996 ने हिगणघाट दतमंन्दिर वार्ड येथील रहिवासी विवाहित मुलगी सौ.सुचिता सुधीर दांडेकर (३५) व नात कु.खुशी सुधीर दांडेकर (१५) या दोगीसह 11:30 वाजताच्या सुमारास गावाकडे परत निघाले असताना बुटिबोरी नजिक त्यांच्या दुचाकिचा अपघात झाला.
या अपघातात पुनिराम एनुरकर,मु.गीरड (समुद्रपुर) यांचा जागीच मृत्यु झाला तर विवाहित मुलगी सौ.सुचिता व नात कु.खुशी दांडेकर गम्भीर जख्मी झाल्या होत्या.
त्यांना नागपुर येथे उपचारासाठी नेत असताना दोघिंचा वाटेतच मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच गीरड व हिगणघाट येथे सर्वत्र शोककड़ा पसरली असून नेमका अपघात कशाने झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अपघाताचा पुढील तपास बुटिबोरी पोलीस करीत आहे..