Home Political गडचिरोली येथे जिल्हास्तरीय महायुती कार्यकर्ता मेळावा…

गडचिरोली येथे जिल्हास्तरीय महायुती कार्यकर्ता मेळावा…

राजेंद्र रामटेके

    प्रतिनिधि

      गडचिरोली येथे जिल्हास्तरीय महायुतीचा महामेळावा “महाराजा” लाँन येथे राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा, शिवसेना व ११ घटक पक्षातिल कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

                जिल्हास्तरीय महायुती महामेळाव्याचे उदघाटन ना.धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री म.रा.यांच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्ष म्हणून खा.श्री अशोक जी नेते होते.महामेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक केन्द्रिय मंत्री सुबोध जी मोहिते होते.

                लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी महाराष्ट्रातील ४५ लोकसभा जागा निवडून आणण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. चिमूर – गडचिरोली लोकसभेची जागा ज्या उमेदवाराला मिळेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी महायुतीतील सर्व घटक पक्षांची राहील असे मार्गदर्शन करतांना नामदार धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी सांगितले. 

       यावेळी मंचावर आ.डॉ.देवराव जी होळी,आ.क्रिष्णाजी गजबे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,भाजपा जिल्हा अध्यक्ष,प्रा.प्रशांतजी वाघरे,शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.राकेश जी बेलसरे ,शिवसेना संपर्क प्रमुख श्री. हेमंत जी जंम्भेवार,प्रहार चे जिल्हा अध्यक्ष श्री. निखिलजी धार्मीक,RPI (आठवले) जिल्हा अध्यक्ष श्री.माधव जी घुटके,RPI(प्रा.कव्हाळे) श्री मुर्लीधर भानारकर,भाजपा लोकसभा विस्तारक श्री. बाबुराव जी कोहळे,लोकसभा समन्वयक श्री प्रमोदजी पिपरे,भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे,महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस ,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष,सौ.गीताताई हिंगे,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अमीताताई मडावी,जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. नानाभाऊ नाकाडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.लिलाधर भरडकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा,शिवसेना व ११ घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.