Home Social गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, तर्फे जागतीक एड्स दिनाच्या औचित्याने मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, तर्फे जागतीक एड्स दिनाच्या औचित्याने मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

प्रितम जनबंधु 

     संपादक 

         गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि.वर्धा तर्फे जागतीक एड्स दिनाच्या औचित्याने जनजागृतीपर कार्यशाळा घेत जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला.

          संत तुकडोजी वार्ड येथील श्रेया महिला बचत गटातील सभासद कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेमार्फत उपाध्यक्ष मंगला लोखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एड्सविषयी समज-गैरसमज यांची विस्तृत माहिती दिली. 

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा भगत, सविता तराळे, सुवर्णा पडोळे, सारिका बोकडे, सोनाली निनावे, वैशाली साटोणे, वैशाली घोडे, मनिष राऊत, यश पडोळे, मंगला समर्थ, निर्मला चौके, शुभांगी गिरडे, आरती क्षीरसागर, सोनाली वाघमारे, वैशाली वासेकर, शशिकला अस्वले, लतीका काकडे, माया व्यापारी इत्यादींनी सहकार्य केले.