शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील दुःख,त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे सांगतात की त्यांच्या भविष्यातील अनिश्चितेत अवकाळी पावसाने अजून भर टाकल्याचे दिसून येत आहे.
परत आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,धान या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने,जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
वेचणीसाठी आलेला कापूस पावसामुळे भिजल्याने त्याची गुणवत्ता खालावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी करून शेतात साठवलेली पाणी बाहेर काढले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पिके अजूनही शेतात पडून आहेत.यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दिवाळी सणाच्या अगदी तोंडावर झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक नुकसान भरपाईचे अनुदान दिवाळी पूर्वी जमा केले जणार असल्याचे सांगितले होते.परंतु हे अनुदान अद्याप जमा झालेले नाही.
त्यात पुन्हा एकदा नवसंकट अतिवृष्टीचे निर्माण झाले आहे,तरिही राज्य सरकार व केंद्र सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे असे चंद्रपूर जिल्हातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते समीर बल्की यांनी म्हटले आहे.
तद्वतच त्यांनी म्हटले आहे की,शासन-प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी…



