भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2025-26 अंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध पर्यटन स्थळे विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ही निधीमंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.
गडचिरोलीच्या सर्वांगीण पर्यटन विकासाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. असे मत आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केले.



