Home देशविदेश मंदिर: विषमतेचे आणि समतेचे….

मंदिर: विषमतेचे आणि समतेचे….

      जगात 70 टक्के लोक आस्तिक आहेत,याचा अर्थ त्यांच्या भावना आणि विचार ” मंदिर ” या गोष्टीशी जोडल्या गेले आहेत.म्हणून या लोकांसाठी ” मंदिर ” हा विषय घेऊन हा लेख लिहित आहे.

       मंदिराचे मी दोन प्रकार केले आहेत.एक विषमतेचे मंदिर आणि दुसरा प्रकार म्हणजे समतेचे मंदिर.

       अर्थात कोणत्या मंदिरास जावे ? हे आस्थिकानीच विचार करायचा आहे.

      विषमतेचे मंदिर म्हणून त्यासाठी मी विषम आकडे आणि समतेचे मंदिरासाठी सम आकडे वापरले आहेत.

       अर्थात मंदिर म्हटले की,त्याचा पाया,त्याच्यावर गाभाऱ्याच्या भिंती,त्या भिंतीवर कळसाच्या गाभाऱ्याच्या भिंती आणि मग त्यावर कळस,अशी ही मंदिराची रचना,( स्ट्रक्चर ) असते.हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

        परंतु समतेच्या आणि विषमतेच्या पायाचे पिलर,भिंती,कळस हे दिसायला एक सारखे असले तरी त्यांच्या संख्या आणि गुण यात फरक आहे,तो कोणता?

            ते मी या लेखातून वाचकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे,तो पुढील प्रमाणे.

 मंदिर विषमतेचे…..

            विषमतेचे हे मंदिर 7 पिल्लरवर उभे आहे.म्हणजेच याचा पाया 7 या विषम अंकावर उभा आहे.

      ते 7 पिल्लर असे,1) शोषण. 2) वर्चस्व.3) श्रेष्ठत्व.4) वंशत्व.5) भेदभाव ( उच्च निच,वरचा खालचा,गरीब श्रीमंत ). 6) लिंगभेद ( स्त्रीपुरूष असमानता ). 7) अस्पृश्यता ( बहिष्कार ).

******

ब ) गाभाऱ्याच्या भिंती 5

पायावर उभारलेल्या भिंती म्हणजे गाभाऱ्याच्या भिंती 5 आहेत.

1) वर्गवाद.2) धर्मवाद.3) वर्णवाद.4) जातीवाद.5) पुरुषी वर्चस्व…

*****

क ) कळस गाभाऱ्याच्या 3 भिंती.

1) घराणेशाही.2) राजेशाही.3) हुकुमशाही.

*****

ड ) विषमतेच्या मंदिराचा कळस.आमानवियता,( हिंस्र पशु ता ).

*******

समतेचे मंदिर…..

             आ) या मंदिराच्या पायाचे पिल्लर 6.

1) स्वातंत्र्य.2) समता.3) बंधुता.4) न्याय.5) समाजवाद.6) धर्म निरपेक्षता.

****

ब ) या मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंती 4.

1) आर्थिक न्याय.2) सामाजिक न्याय.3) राजकीय न्याय.4.) धार्मिक न्याय.

*****

क ) या मंदिराच्या कळस गाभाऱ्याच्या भिंती 2 आहेत.

1) समान संधी.2) समान दर्जा…

******

ड ) समतेच्या या मंदिराचा कळस…

        मानवता ( प्रेम दया क्षमा शांती सत्य )

      अशी ही दोन मंदिरे आहेत,यातील कोणते मंदिरात गेल्याने आपणास शांती आनंद मिळेल ? हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे.

      लेखक :- दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक: 31 ऑक्टोबर 2025. फोन: 94 20 91 22 09.