Home Maharashtra अवकाळी पावसामुळे धान,कापूस,सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान… — सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबतचे...

अवकाळी पावसामुळे धान,कापूस,सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान… — सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबतचे दिले तहसीलदार चिमूर यांना निवेदन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

चिमूर :- दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ ला झालेल्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस,धान,सोयाबीन पिकाला प्रचंड प्रमाणात फटाका बसलेला असुन अतोनात नुकसान झाले आहे.

           पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने धान उत्पादक शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाले आहेत.यामुळे शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केली.

         शेतकरी,कामगार,विद्यार्थी,आदिवासी तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महाएल्गार मोर्चाच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा निवेदकर्ता शेतकऱ्यांनी दिला होता.

           महाएल्गार मोर्चा यांनी घेतलेले प्रश्न आणि मागण्या या समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि आवश्यक आहेत.त्यामुळे आम्ही त्यांच्या आंदोलनात नैतिक व सामाजिक पाठिंबा जाहीर करीत आहोत असेही निवेदनात म्हटले होते.

         आमच्या न्याय मागण्यांची शासनाने तात्काळ दखल घ्यावी व योग्य तो निर्णय घ्यावा,ही आमची मागणी आहे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

         निवेदन देतांना शेतकरी सुभाष दडमल,निखिल जिवतोडे,दिपक नन्नावरे,प्रकाश गायकवाड,भास्कर बदके,चेतन राने,गजानन बुटके,संदिप धारणे,अनिल रामटेके,अविनाश रामटेके,गजानन बुटके,शांताराम शेलवटकर,संदिप धारणे व आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.