Home कृषी कृषी केंद्र संचालकचा साथी पोर्टल फेज-२” विरोधात एक दिवसीय लाक्षणिक बंद… ...

कृषी केंद्र संचालकचा साथी पोर्टल फेज-२” विरोधात एक दिवसीय लाक्षणिक बंद… — तालुका कृषी अधिकारी यांना दिले निवेदन…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

गडचिरोली डिस्ट्रीक ॲग्रो डिलर्स असोशिएशन धानोरा तर्फे साथी पोर्टल फेज-२” विरोधात एक दिवसीय लाक्षणिक बंद बाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले.

       सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र फर्टीलायजर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन (MAFDA) ह्यांच्या वतीने”साथी पोर्टल फेज-२” ह्या प्रणाली विरोधात राज्यभरातील सर्व कृषी केंद्र धारकांत तीव्र नाराजी आहे.

         पोर्टलच्या अंमल बजावणीमुळे कृषी केंद्र धारकांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया, तांत्रिक अडचणी तसेच व्यवहारात अनावश्यक विलंब ह्या बाबींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे आणि औषधींचा पुरवठा करण्यात अडचणी येतील.

         याचा बाबींचा निषेध माणून महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी केंद्र मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एक दिवसीय बंद पाळणार आहेत. ह्या बंद मध्ये गडचिरोली एग्रो डीलर्स असोसिएशन गडचिरोली तर्फे धानोरा तालुक्यातील सर्व कृषी केंद्र बंदात सहभागी आहे. हे बंद शेतकऱ्यांच्या हितासाठी व प्रणालीतील त्रुटी विरोधात आहे एक प्रतीकात्मक आंदोलन म्हणून हा बंद करण्यात येत आहे.

         कृषी केंद्र चालकाची भूमिका समजून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आमची अडचण निदर्शनास आणून द्यावी तसेच शेतकऱ्यांसाठी सुलभ व कार्यक्षम प्रणाली राबविण्यात यावी यासाठी तालुका कृषी अधिकारी धानोरा यांना कृषी केंद्र चालक यांनी निवेदन दिले. निवेदन देतेवेळी साई कृषी केंद्राचे संचालक विजय साळवे जे बी कृषी अग्रो चे संचालक जयेंद्र गायकवाड व इतर उपस्थित होते.