Home Vidarbha बल्हारपूर तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाचे आयोजन!…

बल्हारपूर तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाचे आयोजन!…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        महसूल विभागाच्या वतीने राज्यात महसूल दिन दि.१आगस्ट २०२५ ला साजरा करण्यात येत असून याच निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शुक्रवार दि.१ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत महसूल सप्ताह्याचे आयोजन करण्यात आले आहे.

        तरी बल्हारपूर तालुक्यातील जनतेनी व शेतक-यांनी मोठ्या संख्येने महसूल सप्ताह्यात सहभागी व्हावे असे आवाहन बल्हारपूर तहसिल कार्यालयाच्या तहसिलदार रेणूका लता जगन्नाथ कोकाटे यांनी केले आहे.

         या महसूल सप्ताह्याचा शुभारंभ आज(शुक्रवारी ) होत असल्याचे तहसिलदार कोकाटे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.