अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार… — बदनापूर येथील घटना: रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यानची घटना…

 

अबोदनगो चव्हाण 

चिखलदरा तालुका

प्रतिनिधी

 

चिखलदरा:- चिखलदरा तालुक्यातील बदनापूर येथे रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने प्रकाश रामसिंग काळे वय 25 राहणार सोलामहू या युवकाला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.

           मृतक प्रकाशला डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने तो जागीच ठार झाला.अपघात घटनास्थळी सकाळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती तर दुसरीकडे या घटनेने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

         वाहण चालक त्यागे वाहन घेऊन फरार झाला होता.परंतु त्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले व भांदवी कलम २७९,३०४(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

      अपघात करणारा ट्रक आणी ट्रक चालक शोधण्याकरीताही टीम लावण्यात आली होती.

या मध्ये आरोपी सत्यम माणिक बारस्कर वय ३० वर्ष रा.निमदरी,ता.अचलपुर यास अटक केली.

       धामणगाव ते बागलिंगा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रक तसेच इतर वाहने वेगात धावतात, त्यामुळे या वाहनांवर नियंत्रण आणले जावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

       चिखलदरा पोलीसांनी सदर पंचनामा घटनास्थळी करुन मृतदेह शवविच्छेदन करीता अचलपूर कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आले.

         चिखलदरा पोलीस स्टेशनचे थानेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदशनाखाली,ए.पि.आय. आर राठोड़,हेड कांस्टेबल दीपक प्रभाकर चव्हाण,सुरज कआस्दएकर,विनोद ईसड,श्रीकांत आशीष वरगट, श्रीराम काले पुढील तपास करीत आहेत.