जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सामान्य रुग्णालय भंडारा येथे भावेश कोटांगले संचाचे सादरीकरण…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 भंडारा -राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा च्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. 

     त्या कार्यक्रमाचे उदघाटन ऍड. गवारे साहेब न्यायाधीश भंडारा ,डॉ. अतुल टेम्भुरने अति.जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ.सचिन चव्हाण अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.मनिष बत्रा जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, डॉ. शैलेश कुकडे जिल्हा सल्लागार असंसर्गजन्य रोग, डॉ. रिम्पल लोणारे ,आरती कातुरे, कीर्ती बन्सोड यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.

त्या नंतर जनजागर कलापथक संच एकोडी च्या वतीने भावेश कोटांगले व संचाच्या वतीने गीत ,प्रबोधन, पथनाट्य यांचे माध्यमातून,तंबाखू चे दुष्परिणाम, त्या पासून होणारे रोग त्याविषयीची जनजागृती करण्यात आली. त्याप्रसंगी तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. 

    त्यावेळी कलापथक संचामध्ये संदिप कोटांगले, सोनू मेश्राम, अरविंद शिवणकर, यशवन्त बागडे,अर्चना कान्हेकर, दीपाली यावलकर उपस्थित होते . 

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.