माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या अश्वांचे अंकलीहून प्रस्थान… — माऊलींच्या मानाच्या अश्वांचे १० जून रोजी अलंकापुरीत आगमण..

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात परंपरेनुसार अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली ( जि. बेळगांव ) येथून आळंदी साठी बुधवारी झाले. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पाटील यांच्या हस्ते या अश्वांचे पूजन करण्यात आले. या प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, युवराज विहानराजे शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर, अजित परकाळे , निवृत्ती चव्हाण, माऊली गुळुजकर आदीसह वारकरी उपस्थित होते.

        संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे बुधवारी निर्जला एकादशीला शितोळे- अंकली (ता. चिकोडी, जि . बेळगांव ) येथून सकाळी 11 वाजता प्रस्थान झाले. हे अश्व अंकली ते आळंदी हा पायी प्रवास करुन 10 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तिर्थक्षेत्र आळंदीत दाखल होतील.